चोरीच्या संशयाखाली पकडलेला तरुण निघाला कोरोना पॉझिटिव्ह, पोलीस ठाण्यात खळबळ
चोरीच्या संशयाखाली पकडलेला तरुण निघाला कोरोना पॉझिटिव्ह, पोलीस ठाण्यात खळबळ
त्यानंतर 24 जून 2020 रोजी 3 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. म्हणजे 2 लाख ते 3 लाख हा टप्पा 23 दिवसांत गाठला गेला. तर 14 जुलै 2020 रोजी 4 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. 3 लाख ते 4 लाख चाचण्या हा टप्पा 20 दिवसांत पार पडला.
हा चोर दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असताना दुकान मालकाने सीसीटिव्ही फूटेजमध्ये पाहिले आणि पोलिसांना फोन केला
आग्रा, 20 एप्रिल : शनिवारी चोरीच्या संशयाखाली पकडला गेलाला तरुण कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) असल्याचे समोर आले आहे. हरी पर्वत ठाण्यात याबाबतची माहिती मिळताच गोंधळ उडाला. चोराला पकडलेला जवान आणि जीप चालकाला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी शाह मार्केट येथील दुकानाचा मालक आपल्या घरातील मार्केटमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तेथील परिस्थिती पाहत होता. त्यादरम्यान एक तरुण दुकानाबाहेर कुलूप तोडत असल्याचे दिसले. चोरीच्या संशयाने त्याने तातडीने 112 क्रमांकावर संपर्क करीत पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळताच पोलिसाने तरुणाना घटनास्थळी जाऊन अटक केले.
चौकशीदरम्यान त्या तरुणाने सांगितले की तो शाह मार्केटमधील एका दुकानात काम करतो आणि तो वजीरपुरा क्षेत्रातील राहणारा आहे. वजीरपुराचे नाव घेताच पोलीस सतर्क झाले. कारण कोरोना हॉटस्पॉटमध्ये वजीरपुर क्षेत्राचा समावेश आहे. पहिल्यांदा पोलिसांनी त्याच्याविरोधात चोरीचा संशयाखाली गुन्हा दाखल केला आणि त्याला तातडीने चाचणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. रविवारी रात्री आलेल्या चाचणीच्या निकालानुसार तो तरुण कोरोना पॉझिटिव्ह (Covid - 19) असल्याचे समोर आले. यानंतर मात्र पोलीस ठाण्यात गोंधळ सुरू झाला. या तरुणाला जीपमधून पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते आणि जीपमधून त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. यानंतर जीप चालक व पोलीस जवानाला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. पोलीस ठाणे सॅनेटाइज करण्यात आले आहे.
संबंधित -रोजंदारीवर पोट भरणाऱ्या केनियातील भारतीयाने 24000 भुकेल्यांना पुरवले अन्न-धान्य
पालघर हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, पण कोणी आगही लावू नये : उद्धव ठाकरे
टाटांचे मोबाइल पेट्रोल पंप लॉकडाऊनमध्ये हिट,पुण्यातील स्टार्टअप देतंय घरपोच इंधन
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.