Home /News /maharashtra /

भूत भूत म्हणून शीर नसलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल करणे 3 तरुणांना पडले भारी, आता...

भूत भूत म्हणून शीर नसलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल करणे 3 तरुणांना पडले भारी, आता...

शिर नसलेला एक मुलगा व एक महिला रस्त्याने उलट्या पावली चालत आहे.

शिर नसलेला एक मुलगा व एक महिला रस्त्याने उलट्या पावली चालत आहे.

शिर नसलेला एक मुलगा व एक महिला रस्त्याने उलट्या पावली चालत आहे.

  जळगाव, 26 सप्टेंबर : सोशल मीडियावर (social media) हल्ली कोण काय व्हायरल (viral) करेल याचा नेम नाही. कशाचा काहीही अर्थ काढून व्हिडीओ असो अथवा फोटो व्हायरल करण्याचं फॅडच लोकांना लागलं आहे. असाच एक व्हिडीओ व्हायरल (video viral) करणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. शिर नसलेल्या मुलाचा  व्हिडीओ या पठ्यांनी व्हायरल केला होता. पण, पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. घडलेली हकीकत अशी की,  शिर विरहित धड असलेला व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांना फत्तेपुर पोलिसांनी (fatepur video) ताब्यात घेतले आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ फत्तेपूर देऊळगाव परिसरातला होता. त्यामुळे लोकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच झालं असं की, हे तिघे तरुण कारमधून प्रवास करत होते. रात्रीच्या अंधारातून जात असताना कारच्या समोर अचानक एक महिला आणि मुलगा आला. त्यांनी पाहिले असता त्यांना असा समज झाला की, मुलाचे धड तर आहे पण शिर नाही. एवढंच नाहीतर शिर नसलेला हा मुलगा व एक महिला रस्त्याने उलट्या पावली चालत आहे. 'माफी मागणारच नाही', महिलेला शिवीगाळ करणाऱ्या भाजप आमदारांचं उत्तर या पठ्यांनी हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ बुधवारी रात्री तरुणांनी कारच्या प्रकाशात तयार केला होता. त्यामुळे नेमकं काय आहे, हे सुद्धा स्पष्ट दिसतं नव्हतं. त्यानंतर या पठ्यांनी तोरणळ्या पटाळ फाट्यावर भूत फिरत असल्याचा मजकूर टाकून गुरुवारी तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे फत्तेपूर तोरणाळा, देऊळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत जामनेर तालुक्यात चर्चा पसरली. रात्रीच्या वेळी लोकांनी या मार्गाने जाणे सुद्धा बंद केले. गुडघ्यातून वाहत होतं रक्त, तरीही CSK च्या प्लेअरचा सीमारेषेवर अफलातून झेल याबाबतचा विषय फत्तेपूर येथील काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसांच्या कानी घातला. त्यानंतर  फत्तेपूर पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा पहूर पोलीस ठाण्यात तपासणीसाठी हजर केले आहे. ज्या तीन तरुणांनी हा व्हिडिओ बनवला आहे. तो बनावट असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. पोलिसांनी या तिन्ही तरुणावर पहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Jalgaon, Viral video.

  पुढील बातम्या