• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • 'माफी मागणारच नाही', महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या भाजप आमदारांचं स्पष्टीकरण

'माफी मागणारच नाही', महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या भाजप आमदारांचं स्पष्टीकरण

'जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे ती माझी नाही.आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझी बदनामी करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केली जात आहे'

  • Share this:
पुणे, 26 सप्टेंबर : पुण्यातील (pune) भाजपच्या आमदाराने (bjp mla sunil kamble audio clip) एका महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण, ती ऑडिओ क्लिप माझी  नाहीच, त्यात असणारा आवाज सुद्धा माझा नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असं स्पष्टीकरत भाजपचे आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी दिलं आहे. पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी एका महिला अधिकाऱ्याला फोन केला होता. त्यावेळी शिवीगाळ करत असल्याची ऑडीओ क्लिप आज व्हायरल झाली होती. त्यानंतर आता आमदार सुनील कांबळे यांनी पुढे येऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे ती माझी नाही.आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझी बदनामी करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केली जात आहे. त्यात असणारा माझा आवाज नाही. हे विरोधकांचं षडयंत्र आहे, असं सुनील कांबळे म्हणाले. Daughter's Day 2021: सुप्रिया पिळगांवकर यांनी शेअर केले लेक श्रियाचे Unseen Pic तसंच, या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज मागे पुढे करण्यात आला आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये मी सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे विरोधकांना हे जड जात आहे. त्यामुळे हे माझ्याविरोधात कटकारस्थान आहे, असा दावाही कांबळे यांनी केला. 'पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळे, महापौर आणि चित्रा वाघ यांच्याशी बोलणं झालं आहे. हा भाजपच्या विरोधात रचलेला कट आहे, अशी माहिती दिली आहे. गेल्या २५ वर्षांत ज्यांना काम जमले नाही ते काम आम्ही केलं आहे, त्यामुळे अशीही क्लिप व्हायरल केली आहे, असंही सुनील कांबळे यांनी म्हटलं. या क्लिप विरोधात मी पोलिसात तक्रार करणार आहे. पोलिसांनी माझी बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणीही कांबळे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आज भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील कांबळे यांचं तातडीनं निलंबन करावं आणि सुष्मिता शिर्के यांना महापालिकेमध्ये पुन्हा एकदा त्याच पदावर रुजू करावं अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. दरम्यान उद्या पुणे पोलीस आयुक्तांकडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून सुनील कांबळे यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात येणार आहे.
Published by:sachin Salve
First published: