दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसला टी -20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळालेले नाही. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही सामन्यांमध्ये त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. पण एकूण हंगामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने 9 सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने 351 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 4 अर्धशतके केली आहेत. नाबाद 95 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने आतापर्यंत 31 चौकार आणि 15 षटकार मारले आहेत. सीएसकेने गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली नव्हती, पण फाफ डु प्लेसिसने तेव्हाही चांगली फलंदाजी केली होती. हे वाचा - IPL 2021: Playing 11 मध्ये मिळाली नाही संधी, जबरदस्त कॅच घेत जिंकली सर्वांची मनं VIDEO दोन्ही संघ- चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम करेन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेजलवूड. कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, प्रणव कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.Faf du Plessis taking the catch of Eoin Morgan.🔥#CSKvsKKR pic.twitter.com/OHISazQ7lA
— M. (@RunMachine_18) September 26, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.