Home /News /maharashtra /

Solapur Accident: सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू

Solapur Accident: सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू

Solapur Accident: सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू

Solapur Accident: सोलापुरात भीषण अपघात; झाडाला धडकून भरधाव स्कॉर्पिओचा चक्काचूर, तिघांचा जागीच मृत्यू

Major accident in Solpaur, speeding Scorpio hits tree: भरधाव स्कॉर्पिओने झाडाला जोरदार धडक दिल्याने एक मोठा अपघात झाला आहे. सोलापूर - विजयपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे.

सोलापूर, 16 जानेवारी : सोलापुरात भीषण अपघात (major accident in Solapur) झाला आहे. भरधाव स्कॉर्पिओने झाडाला जोरदार धडक (speeding Scorpio hits tree) दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू (3 people died on the spot) झाला आहे. सोलापूर - विजयपूर महामार्गावर (Solapur - Vijaypur highway) तेरामैल येथे हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेले तिघेही सोलापूर येथील निवासी आहेत. गाडी चालवताना वेगावर नियंत्रण असणं आवश्यक असतं. त्यासंदर्भात रस्त्यांच्या शेजारी अनेक ठिकाणी बोर्ड्सही लावण्यात आलेले असतात. मात्र, असे असतानाही अनेकदा प्रवासी आपल्या गाडीचा वेग अधिक ठेवतात आणि त्यामुळे अपघात होत असतात. आता सोलापूर येथून अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. भरधाव असलेल्या स्कॉर्पिओ गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. वाचा : आर्वी गर्भपात प्रकरणात खळबळजनक माहिती उघड, डॉक्टर नीरज कदमलाही बेड्या हा अपघात इतका भीषण होता की, त्यात स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला असल्याचं दिसून येत आहे. या अपघातता तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे अशी मृतांची नावे आहेत. तर राकेश हच्चे हा इसम या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूर - विजयपूर महामार्गावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल येथे हा अपघात झाला आहे. हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याची माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र, गाडीचा वेग अधिक होता आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी जीपचा टायर फुटून भीषण अपघात 16 नोव्हेंबर रोजी अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात झाला होता. जीपचा टायर फुटल्याने हा अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवेसी जखमी झाले होते. या अपघातात 10 ते 15 प्रवाशी जखमी झाले होते. या अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Accident, Solapur

पुढील बातम्या