मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Solapur Accident: अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

Solapur Accident: अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

Solapur accident news: जीपचा टायर फुटून सोलापूर येथे भीषण अपघात झाला आहे.

सोलापूर, 16 नोव्हेंबर : अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात (jeep accident at solapur) झाला आहे. जीपचा टायर फुटल्याने हा अपघात (Cruiser jeep tyre bust) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवेसी जखमी झाले आहेत. (Solapur accident killed 5 passengers)

या अपघातात 10 ते 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघाताच्या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या क्रुझर जीपचा टायर फुटला. गाडीचा टायर फुटल्याने जीप पलटली आणि हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

जीपचा टायर नेमका कशामुळे फुटला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बाबा मिस्त्री यांनी आरोप केला आहे की, एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जीपचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच जीप चालकही प्रवासी संख्येहून अधिक जणांना गाडीत बसवत प्रवास करत आहेत. यामुळेच हा अपघात घडला आहे.

अपघातानंतर रुग्णवाहिकाही त्वरित उपलब्ध झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आम्ही जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असंही बाबा मिस्त्री यांनी म्हटलं आहे.

कोल्हापुरात भीषण अपघात, स्फोट होऊन 200 मीटर दरीत कोसळली कार

गेल्या आठवड्यात कोल्हापुरात कारला भीषण अपघात झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावर हा अपघात झाला होता. अपघातानंतर गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात कारने पेट घेतला आणि यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कागल - मुरगूड रस्त्यावर वाघजाई घाडात हा अपघात झाला आहे. सकाळी धावत्या कारमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही गाडी थेट दोनशे मीटर दरीत जाऊन कोसळली असं बोललं जात आहे. यामुळे कारने पेट घेतला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

10 दिवसांपूर्वी माळशेज घाटात भीषण अपघात

कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात एका कारला 10 दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली आहे. या दुर्दैवी घटनेत एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य सहा जण गंभीर जखमी झाले होते. कार दरीत कोसळल्यानंतर कारने पेट घेतल्याचं देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. मोरोशी येथील भैरवगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या काही औरंगाबादच्या तरुणांनी जखमींना बाहेर काढलं आहे. या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना देण्यात आली आहे.

First published:

Tags: Accident, Solapur