रत्नागिरी, 12 जानेवारी : कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात (Aamba Ghat at Kolhapur Ratnagiri road) कारचा भीषण अपघात (Major accident) झाला आहे. या अपघातात स्विफ्ट कार थेट 300 फूट खोल दरीत कोसळली (car fall down in 300 feet valley) आहे. अपघाताची माहिती मिळताच घनाटस्थळी पोलीस पथक दाखल झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. (Major accident in Aamba Ghat on Kolhapur Ratnagiri road, car fall down in 300 feed valley)
घटनास्थळी हेल्प अकॅडमीचे कार्यकर्ते सुद्धा दाखल झाले आहेत. पोलीस आणि हेल्प अकॅडमीच्या पथकाकडून घटनास्थळावर बचाव आणि मदतकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आले आहे.
हा अपघात नेमका कसा झाला? अपघात झालेल्या गाडीत नेमके किती माणसं होती? या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. घटनास्थळावर स्थानिक ग्रामस्थही दाखल झाले असून पोलिसांना मदत आणि बचावकार्यात मदत करत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये.
आंबा घाट नेमका कुठे?
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आंबा घाट आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर हा घाट आहे. हा घाट खूपच वळणा-वळणाचा आहे. हा घाट समदुर्सपाटीपासून दोन हजार किमी अंतरावर असून निर्सगरम्य वातावरण आणि पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे. येथे पर्यटनासाठीही मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात.
दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात एक भीषण अपघात झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावर हा अपघात (accident at Kagal Murgud road) झाला होता. अपघातानंतर गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात कारने पेट घेतला आणि यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू (one died in accident) झाला होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कागल - मुरगूड रस्त्यावर वाघजाई घाडात हा अपघात झाला होता. सकाळी धावत्या कारमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही गाडी थेट दोनशे मीटर दरीत जाऊन कोसळली असं बोललं जात आहे. यामुळे कारने पेट घेतला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.