Home /News /maharashtra /

महाविकासआघाडी का शिंदे-फडणवीस? या दोन निवडणुका ठरवणार महाराष्ट्राचं पुढचं राजकारण

महाविकासआघाडी का शिंदे-फडणवीस? या दोन निवडणुका ठरवणार महाराष्ट्राचं पुढचं राजकारण

जून महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भुकंपामुळे राज्यातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांना घेऊन बंड केलं, त्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 जुलै : जून महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भुकंपामुळे राज्यातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांना घेऊन बंड केलं, त्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, हे निश्चित मानलं जात होतं, पण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट आला. भाजपने थेट एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे गटाने बंड करून महाविकासआघाडी सरकार उलथवलं असलं तरी हे सगळे आमदार आपण शिवसेनेतच आहोत, असं प्रत्येकवेळी सांगत आहेत. एकीकडे हा लढा सुप्रीम कोर्टात सुरू असला तरी खरी लढाई येऊ घातलेल्या दोन निवडणुकांमध्ये होणार आहे. या दोन निवडणुकांमध्ये शिंदे-फडणवीस भारी ठरणार का महाविकासआघाडी धोबीपछाड देणार, यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरणार आहे. शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं मे महिन्यात निधन झालं, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी फक्त मुख्यमंत्रीपदच नाही तर विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे, त्यामुळे या जागेसाठीही निवडणूक होईल. अंधेरी पूर्व आणि विधानपरिषदेच्या जागेसाठी महाविकासआघाडी एकच उमेदवार देणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी भेट घेण्यासाठी गेले आहेत. हे नेते राहुल गांधी यांनाही भेटणार आहेत. राज्यात 2019 साली महाविकासआघाडी स्थापन होत होती, तेव्हा राहुल गांधी या प्रयोगासाठी फार इच्छुक नव्हते, त्यामुळे आता राहुल गांधी काय भूमिका घेणार, यावरही महाविकासआघाडी अस्तित्वात राहणार का नाही, हे ठरणार आहे. महाविकासआघाडीने समन्वय साधत दोन जागांसाठी दोनच उमेदवार रिंगणात उतरवले तर महाविकासआघाडी आणि शिंदे-भाजप यांच्यात थेट लढत होईल. येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्याआधी सगळ्याच पक्षांसाठी ही पोटनिवडणूक लिटमस टेस्ट ठरू शकते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde, Uddhav thackeray

    पुढील बातम्या