मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'चौकशीशिवाय कारवाई ठरेल अन्यायकारक', महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून संजय राठोडांची पाठराखण

'चौकशीशिवाय कारवाई ठरेल अन्यायकारक', महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून संजय राठोडांची पाठराखण

पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या आत्महत्येनंतर महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीतील एक मंत्री मात्र राठोडांची पाठराखण करताना दिसत आहेत.

पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या आत्महत्येनंतर महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीतील एक मंत्री मात्र राठोडांची पाठराखण करताना दिसत आहेत.

पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या आत्महत्येनंतर महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीतील एक मंत्री मात्र राठोडांची पाठराखण करताना दिसत आहेत.

तुषार कोहळे

नागपूर, 27 फेब्रुवारी: पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या आत्महत्येनंतर महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचे काही फोटो, ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ लीक झाल्यानंतर तर राठोडांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान याबाबत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही आहे. विरोधक याप्रकरणी आक्रमक झाले असून राज्यभरात भाजपने ठिकठाणी आंदोलन देखील केलं आहे. विरोधकांकडून संजय राठोडांच्या राजीनाम्याबरोबरच त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मात्र संजय राठोडांची पाठराखण केली आहे. न्यूज18 लोकमतशी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की चौकशी न करता राठोडांवर कारवाई करणं अन्यायकारक होईल.

चौकशी न करता वन मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करणे हे अन्यायकारक होईल असे म्हणत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांची पाठराखण केली आहे. सध्या राठोडांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे, विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. जर संजय राठोड दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे देखील ते म्हणाले.

(हे वाचा-'शरद पवार माझा बापच आहे',पती विरोधातील गुन्ह्यानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर योग्य वेळ निर्णय घेईल मात्र मागच्या पाच वर्षात भाजपच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यावर त्याच्या  नेत्यांनी किती राजीनामे घेतले असा सवाल त्यांनी भाजपला विचारला. चित्रा वाघ यांच्या कुटुंबीयांवर पोलिसांनी केलेली कारवाई सूडबुद्धीची म्हणता येणार नाही, असंही ते म्हणाले.

(हे वाचा-सर तुम्ही मास्क का नाही लावला? पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं बेधडक उत्तर)

दरम्यान याप्रकरणी भाजप विशेष आक्रमक झाली आहे. भाजपच्या महिला मोर्चाने रस्त्यावर उतरुन पूजाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी संजय राठोड यांच्याविरोधात आंदोलनं करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार, संजय राठोड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईतील मुलुंड टोलनाका जाम करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. याशिवाय नवी मुंबई, यवतमाळ, वसई-विरार, औरंगाबाद, चेंबूर याठिकाणी देखील रस्त्यावर उतरून भाजपकडून आंदोलन करण्यात आलंय. याशिवाय भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यांनी यावेळी पोलीस प्रशासन गुन्हेगाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.

First published:

Tags: BJP, Chitra wagh, Maharashtra, Pooja Chavan, Sanjay rathod, Uddhav thacakrey, Vijay wadettiwar