मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सर तुम्ही मास्क का नाही लावला? पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं बेधडक उत्तर

सर तुम्ही मास्क का नाही लावला? पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं बेधडक उत्तर

मराठी भाषा दिवसाच्या (Marathi Bhasha Din) निमित्ताने शिवाजी पार्कात (Shivaji Park) आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थिती लावली. यावेळी समोर प्रचंड गर्दी असतानाही राज ठाकरेंनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता.

पुढे वाचा ...

मुंबई 27 फेब्रुवारी : मराठी भाषा दिवसाच्या (Marathi Bhasha Din) निमित्ताने शिवाजी पार्कात (Shivaji Park) आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थिती लावली. यावेळी विविध मुद्द्यांवरुन त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. शिवजयंती किंवा मराठी भाषा दिनाच्या दिवशी कार्यक्रमाला गर्दी करु नये, या सरकारच्या निर्देशाचाही त्यांनी समाचार घेतला. यांना राजकीय कार्यक्रमांना मंत्र्यांनी केलेली गर्दी चालते. इतकंच वाटतं तर निवडणुका पुढे ढकला, असा शब्द राज ठाकरेंनी टीका केली.

यावेळी समोर प्रचंड गर्दी असतानाही राज ठाकरेंनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तुम्ही मास्क का लावला नाही, या पत्रकाराच्या प्रश्नावरही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय, असं म्हणत राज यांनी काढता पाय घेतला. एकीकडे राज ठाकरे यांचे बंधू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जनतेला सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करत आहेत. तर, दुसरीकडे राज यांनी मात्र मी मास्क घालतंच नाही, असं उत्तर देत मुख्यमंत्र्याच्या या आवाहनाला काडीचाही प्रतिसाद दिलेला नाही.

यावेळी एका पत्रकारानं राज यांना असाही प्रश्न विचारला, की निवडणुकांच्या वेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं जातं. मात्र, हा मुद्दा केवळ राजकारणासाठीच वापरला जातो, असं का? यावर राज ठाकरेंनीच पत्रकाराची फिरकी घेत नेमकं काय राजकारण केलं जातं, असा उलट प्रश्न विचारला. याशिवाय लॉकडाऊनचा कलाकारांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामाबद्दल बोलताना त्यांनी याचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला असल्याचंही म्हटलं. शिवाजी पार्कात मनसेने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी राज ठाकरे यांनी सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

First published:

Tags: Marathi language, Mask, Raj Thackeray