मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सावध पवित्रा?, कायदे नियमांमध्ये बदल करण्यासाठी हालचाली

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सावध पवित्रा?, कायदे नियमांमध्ये बदल करण्यासाठी हालचाली

Assembly Speaker Election:  पावसाळी अधिवेशनात राज्यातील विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक (Election) होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडणूक झाली नाही.

Assembly Speaker Election: पावसाळी अधिवेशनात राज्यातील विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक (Election) होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडणूक झाली नाही.

Assembly Speaker Election: पावसाळी अधिवेशनात राज्यातील विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक (Election) होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडणूक झाली नाही.

मुंबई, 15 जुलै: पावसाळी अधिवेशनानंतर (Monsoon session) पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) विधानसभा अध्यक्षपदावरुन (Speaker of the Assembly) हालचाली सुरु झाल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात राज्यातील विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक (Election) होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडणूक झाली नाही. त्यामुळे अजूनही विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. दरम्यान आता विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी महाविकास आघाडीत हालचाली सुरु झाल्या आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाचे पद सध्या महाराष्ट्रात रिक्त आहे. अध्यक्षपदाची निवडणूक नागपूर अधिवेशनाच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी असलेल्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य विधिमंडळ नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त पद्धतीने मतदान घेऊन घेण्यात येते. मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी विधीमंडळ कायदे नियमांमध्ये बदल करण्याबाबत हालचाली सुरु झाल्यात आहेत. दरम्यान तशा प्रकारचा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीमध्ये पारित झाला असून तो सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा- सिक लिव्हवर असलेल्या परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

या संदर्भात ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप पक्षाचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. काही दिवसांआधी या संदर्भात कायदे मंडळ समितीची एक बैठक झाली. या समितीत भाजपच्या दोन सदस्यांपैकी एक सदस्य निलंबित असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरे आमदार जयकुमार गोरे हे या बैठकीला अनुपस्थित होते.

विधिमंडळ कायदे समितीची बैठक नुकतीच झाली असून अधिवेशन कालावधीमध्ये यासंदर्भात प्रस्ताव आणून तो मंजूर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या नियमावलीनुसार जर विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घ्यायचे ठरले तर गोपनीय करावे असा नियम आहे. पण गोपनीय मतदानामध्ये दगाफटका होऊ शकतो हे लक्षात घेत मूळ कायद्यातच बदल करत नवीन खुल्या किंवा आवाजी मतदानानं मतदान घ्यावे असा कायदा करण्याचा विचार सुरू आहे.

हेही वाचा- विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात प्राध्यापकाकडूनच विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले दोन अधिवेशन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत मत मतांतर आहे. त्यामुळे तसंच मतांचाही दगाफटका होण्याची भीती असल्याने निवडणूक झाली नाही असं समजतंय. त्यामुळेच यापुढील अधिवेशनामध्ये जर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक करायची असेल तर पूर्वी आधीच्या कायद्यांमध्ये बदल करण्याचा विचार असल्याचे समजतंय.

First published:

Tags: Maharashtra politics, Vidhan sabha