पुणे, 15 जुलै: पुण्यात (Pune) महाविद्यालयीन प्राध्यापकाला (College professor) अटक करण्यात आली आहे. (accused has been arrested) विद्यार्थिनीशी गैरवर्तन (inappropriate behavior) केल्याप्रकरणी ही कारवाईक केली आहे. पुणे पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एका विद्यार्थिनीनं महाविद्यालयीनं प्राध्यापकानं आपल्यासोबत अयोग्य वर्तन केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी प्राध्यापकाला अटक केली आहे. आरोपी प्राध्यापकावर आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निरीक्षक (गुन्हे) फरसखाना पी.एस पुणे कुंडलिक कायगुडे यांनी सांगितलं.
Maharashtra | College professor held after a girl student complained of inappropriate behavior in Pune.
— ANI (@ANI) July 15, 2021
The accused has been arrested. Case registered under relevant sections of IPC. Further process is underway: Kundlik Kaygude, Inspector (Crime) Faraskhana PS, Pune (14.07) pic.twitter.com/NwAUUcizNk
दुसरी घटना, मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी पुण्यात एका महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे मार्क वाढवून देण्याचं आमिष दाखवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केला. कर्मचाऱ्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात विनयभंग आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- सिक लिव्हवर असलेल्या परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय ही बाब उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनीच्या घरच्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला चोप देत त्याची महाविद्यालय ते पोलीस ठाण्यापर्यंत काळे फासत धिंड काढली. अभिजित पवार असे या कर्मचाऱ्याचं नाव आहे. पवार हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील कर्मचारी आहे.