जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Weather Forecast : यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी देणार दांडी, पाऊस पुन्हा थैमान घालणार?

Weather Forecast : यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी देणार दांडी, पाऊस पुन्हा थैमान घालणार?

Weather Forecast : यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी देणार दांडी, पाऊस पुन्हा थैमान घालणार?

राज्यात यंदा परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातल्याने 25 ऑक्टोबरपर्यंत पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान हवामान खात्याकडून महत्वाची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 नोव्हेंबर : राज्यात यंदा परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातल्याने 25 ऑक्टोबरपर्यंत पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान हवामान खात्याकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस असण्याची शक्यता असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच हिवाळ्याच्या हंगामात देशातील काही भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडी कमी राहण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी काल (दि.01) माध्यमांना माहिती दिली.

जाहिरात

परतीच्या थांबल्यानंतर राज्यात थंडीत कमालीची वाढ झाली आहे. परंतु हवामान खात्याने नोव्हेबर महिन्यातील हवामान अंदाज वर्तवल्याप्रमाणे राज्यात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत झालेल्या परतीच्या पावसाने थैमान घातल्यानंतर पाऊस जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु हवामान खात्याचा नवा अंदाज समोर आल्याने पुन्हा पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा :  पाऊस, ऊन आणि वादळ सर्वात आधी तुम्हाला मिळेल अलर्ट; असे व्हा हवामान शास्त्रज्ञ

नोव्हेंबरमध्ये राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान हे सरासरी व त्याहून अधिक राहण्याचा अंदाज आहे, तर वायव्य भारत आणि हिमालय पर्वताच्या पायथ्याकडील भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

कमाल तापमानाची स्थिती पाहता देशात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा घट होण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातील राज्यांसह ईशान्येकडील राज्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, असेही हवामान विभागाच्या तज्ञांनी माहिती दिली.

जाहिरात

हे ही वाचा :  थंडी वाढली, खराब हवामानामुळे मुंबईसह दिल्लीकरांना फटका, श्वसनाच्या त्रासात वाढ

मागच्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पाऊस वाढणार

नोव्हेंबर महिन्यात देशात 29.7 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होते. दरम्यान ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे दक्षिण भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण या कालावधीत जास्त असते. दक्षिण भारतात नोव्हेंबरमध्ये सरासरी 118.9 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक (123 टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाचा अंदाज आहे.

जाहिरात

महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. देशाच्या अति उत्तर आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उर्वरित देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, असे मोहापात्रा म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात