Home /News /maharashtra /

सांगली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; मुसळधार पावसामुळे देवेंद्र फडणवीसांचा दौरा रद्द

सांगली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; मुसळधार पावसामुळे देवेंद्र फडणवीसांचा दौरा रद्द

सांगली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; मुसळधार पावसामुळे देवेंद्र फडणवीसांचा दौरा रद्द

सांगली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; मुसळधार पावसामुळे देवेंद्र फडणवीसांचा दौरा रद्द

Heavy Rain in Sangli: सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातल्या दुष्काळी भागातही जोरदार पाऊस पडला आहे.

सांगली, 20 मे : राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पाऊस (pre monsoon shower) बरसत असल्याचं पहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातल्या दुष्काळी भागातही पावसाची दमदार बॅटिंग (heavy rain in Sangli) सुरू आहे. जत तालुक्यातल्या दुष्काळी पूर्व भागामध्ये तुफान असा पाऊस पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आपला सांगली दौरा रद्द करावा लागला आहे. सांगलीतील दुष्काळी जत तालुक्यातही गेल्या बारा तासापासून मान्सूनपूर्व धुवाधार असा पाऊस पडत आहे, पूर्व भागात पावसाची संततधार ही अद्याप कायम आहे. तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर येथील मंदिरात पाऊसामुळे जलमय झाल्याने गुडघाभर पाण्यातून भक्तांनी  प्रदक्षिणा घालण्याची वेळ आली आहे. तर वळसंग पासून इतर गावांना जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे. फडणवीसांचा दौरा रद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार (20 मे 2022) रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. दुपारी 12 वाजता जुहू हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत येणार होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि खराब वातावरण यामुळे त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला आहे. वाचा : सोलापुरात एसटीचा भीषण अपघात, बस रस्त्यावरुन थेट शेतात कोसळली, घटनास्थळावरचा VIDEO सांगली जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर टेकऑफ साठी अडचणी निर्माण झाल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सांगली जिल्हा दौरा रद्द झालेला आहे. सुभाषनगर येथे होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यात सरासरी 52.8 मि.मी. पाऊस सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 52.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जत तालुक्यात 93.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 71.4, जत 93.4, खानापूर-विटा 38, वाळवा-इस्लामपूर 33.5, तासगाव 55.6, शिराळा 21.04, आटपाडी 24.8, कवठेमहांकाळ 86.9, पलूस 46.7, कडेगाव 17.8
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Devendra Fadnavis, Maharashtra News, Rain, Sangli

पुढील बातम्या