मुंबई, 16 जानेवारी : सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसने नाशिकची जागा मागून घेतली आणि सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली, पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पूत्र सत्यजीत तांबे रिंगणात उतरले, पण काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून अर्ज करावा लागला. सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडामुळे काँग्रेसवर तर नामुष्की ओढावली, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातीही काहीच लागलं नाही. महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांवर मतदान होणार आहे, पण यातल्या एकाही जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार नाही. या निवडणुकांसाठी अमरावती आणि नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार, कोकणात शेतकरी कामगार पक्ष, नागपुरात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मराठवाड्यात राष्ट्रवादीला तिकीट देण्याचं महाविकासआघाडीचं ठरलं. यातल्या नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आधीपासूनच आग्रही होती, पण चर्चेनंतर ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी मात्र महाविकासआघाडीच्या नेत्यांची चर्चा झाली आणि ठाकरेंच्या शिवसेनेने अर्ज मागे घेतला. नागपूरमधून ठाकरेंच्या पक्षाकडून गंगाधर नाकाडे यांना माघार घ्यावी लागली. नागपूरमध्ये महाविकासआघाडीने सुधाकर आडबाले यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महाविकासआघाडीमध्ये असूनही ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती या निवडणुकीतून काहीच मिळणार नाही. नाशिकमध्ये तिरंगी लढत सत्यजीत तांबे शुभांगी पाटील सुभाष जंगले नागपुरात चौरंगी लढत सुधाकर आडबाले नागो गाणार राजेंद्र झाडे सतीश इटकेलवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.