जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ST महामंडळानं घेतला मोठा निर्णय, लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ!

ST महामंडळानं घेतला मोठा निर्णय, लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ!

ST महामंडळानं घेतला मोठा निर्णय, लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ!

राज्यावर आलेल्या कोरोना महामारीमुळे लालपरी समजली जाणारी एसटी बसला ब्रेक लागला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जुलै: राज्यावर आलेल्या कोरोना महामारीमुळे लालपरी समजली जाणारी एसटी बसला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे सुमारे 10 हजार कर्माचाऱ्यांना नारळ दिला आहे. कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली आहे. महामंडळानं घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. हेही वाचा… मुख्यमंत्री पुढील 2-3 दिवसांत करणार या शहराचा दौरा, लॉकडाऊनबाबत घेणार मोठा निर्णय एसटी महामंडळानं याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाईल, असही पत्रकात म्हटलं आहे.

News18

जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच प्रशिक्षण सुरु आहे, अशांना थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा… सचिन सावंतांचा गंभीर आरोप - ‘महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी राजस्थानातलं सरकार दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका, असं आवाहन सरकारनं केलं आहे. मात्र, सरकारच्या ताब्यात असलेल्या एसटी महामंडळानं सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona , st bus
  • First Published :
जाहिरात
जाहिरात