नाशिक, 17 जुले: संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसनं आता थैमान घालतं आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसोबतच आता राज्यातील इतर शहर आणि ग्रामीण भागातही कोरोनाचं संकट अधिक गडद झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
हेही वाचा...धक्कादायक: मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण महिलेवर अतिप्रसंग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील 2-3 दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील, त्यानंतर शहरात पुन्हा लॉकडाऊन करायचा की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
छगन भुजबळ यांनी म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नाशिकचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यासोबत तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती देखील येणार आहे.
महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे चालणार असल्याचा विश्वासही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर भुजबळ यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दिल्लीतील भेटीवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात परत सत्ता येईल असा, भाजपच्या वरिष्ठांकडून आमदारांना 'लॉलीपॉप' दिला आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्राबाबतची चर्चा या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण समजली जात होती. मात्र, राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न- नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक टीका केली आहे.
हेही वाचा...मुंबईत रहिवाशी इमारत कोसळली, मृतांची संख्या 9, ढिगाराखाली सापडली गरोदर महिला
भाजप आमदारांना इकडे तिकडे बघू नये म्हणून वरिष्ठांकडून महाराष्ट्रात सत्ता परत येईल, असा 'लॉलीपॉप' दिला आहे, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे चालणार असल्याचा विश्वासही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.