परळी, 20 ऑक्टोबर: पंकजा मुंडेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राज्यभरात पडसाद उमटल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. बहीण भावाच्या नात्यात काहीजण विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत असं धनंजय मुंडे म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले. मी जगावं की मरावं या मनस्थितीत होतो असंही म्हणाले. मी भाषणात चुकीचा शब्द बोललो नाही. पण मला खलनायक ठरवण्यात आलं. काहीजणांना मी राजकारण सोडून जावं असंही वाटतं असं ते म्हणालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







