जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Yashomati Thakur Corona | यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

Yashomati Thakur Corona | यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

Yashomati Thakur Corona | यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ताजी असताना आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 डिसेंबर : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) उद्रेक होताना दिसत आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) धडकली आहे. त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारमधील दिग्गज मंत्र्यांना आता कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat Corona) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ताजी असताना आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यशोमती यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी”, असं यशोमती ठाकूर ट्विटरवर म्हणाल्या आहेत.

जाहिरात

हेही वाचा :  महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात तब्बल 8 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आतापर्यंत ‘या’ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हेही वाचा :  ‘थांबायचं नाही, पण…’, महाराष्ट्र कोरोनाच्या सावटाखाली असताना मुख्यमंत्र्यांचे धीर देणारे बोल विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर अनेकांना कोरोना राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. विधीमंडळात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच विधान भवन परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या काही पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा फोफावताना दिसतोय. नागपुरात तर आज 80 पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यातही हाच आकडा 400 च्या पुढे गेला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट गतीने वाढतोय. त्यामुळे चिंता वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात