मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Uddhav Thackeray | 'थांबायचं नाही, पण...', महाराष्ट्र कोरोनाच्या सावटाखाली असताना मुख्यमंत्र्यांचे धीर देणारे बोल

Uddhav Thackeray | 'थांबायचं नाही, पण...', महाराष्ट्र कोरोनाच्या सावटाखाली असताना मुख्यमंत्र्यांचे धीर देणारे बोल

कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र (Maharashtra) आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र (Maharashtra) आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र (Maharashtra) आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

पुढे वाचा ...

मुंबई, 31 डिसेंबर : महाराष्ट्रात (Maharashtra Corona) कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यभरासाठी नवी नियमावली जारी केली आहे. कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. विशेष म्हणजे आज 2021 या वर्षातील सर्वात शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर (31st December) आहे. नववर्षनिमित्ताने दरवर्षी सर्वसामान्यांकडून मोठा जल्लोष केला जातो. पण कोरोनाच्या संकटामुळे या आनंदावर विरजण पडलेलं आहे. या संकाटमुळे सामान्य जनता चिंतेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना धीर देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता थांबायचं नाही, पण सतर्क राहुयात, असं मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करुया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया", अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करुया", असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

"नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी", असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नववर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला केले आहे.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, "नवे वर्ष हे आपल्याला नवनवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात. नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून एक-एकजण म्हणता-म्हणता आपला समाज आणि आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो. हिच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे. नवनवीन संकल्पांसाठी सिद्ध व्हायचे आहे. कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे. यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे. त्यासाठी आणि नवीन वर्ष आरोग्यदायी ठरेल, ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन."

First published:
top videos