Home /News /maharashtra /

सांगलीत मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; गुड्डापूर मंदिर परिसरात गुडघाभर पाणी, रस्ते पाण्याखाली, VIDEO

सांगलीत मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; गुड्डापूर मंदिर परिसरात गुडघाभर पाणी, रस्ते पाण्याखाली, VIDEO

मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; मंदिरात शिरले पाणी, रस्ते पाण्याखाली, पाहा VIDEO

मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; मंदिरात शिरले पाणी, रस्ते पाण्याखाली, पाहा VIDEO

Sangli News: पावसामुळे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सांगली, 20 मे : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस (Pre monsoon shower in Maharashtra) पडत आहे. सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातल्या दुष्काळी भागातही जोरदार पाऊस (heavy rainfall) पडला आहे. जत तालुक्यातल्या दुष्काळी पूर्व भागामध्ये तुफान असा पाऊस पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर येथील मंदिरात पाऊसामुळे जलमय झाल्याने गुडघाभर पाण्यातून भक्तांनी प्रदक्षिणा घालण्याची वेळ आली आहे. तर वळसंग पासून इतर गावांना जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे. तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर मंदिरात पाणीच पाणी झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे आणि भाविकांची नेहमीच येथे गर्दी असते. या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडल्याने गुडघाभर पाणी मंदिर परिसरात साचले आहे. तेथील व्हिडीओ देखील समोर आला आहे. दुष्काळी जत तालुक्यातही गेल्या बारा तासापासून मान्सूनपूर्व धुवाधार असा पाऊस पडत आहे, पूर्व भागात पावसाची संततधार ही अद्याप कायम आहे. गेल्या अनेक वर्षातील हा सर्वात मोठा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. या पावसाने कोकणची अनुभूती येत आहे. तालुक्यात सर्वत्र हा पाऊस सुरूच असून बहुतांशी ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे वळसंग ते सोर्डी, वळसंग ते कोळीगिरी, रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे. तसेच उमराणी, बिळुर, मुचुंडी, शेगाव, वाळेखिंडी ,जत शहर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे. देवेंद्र फडणवीसांचा दौरा रद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार (20 मे 2022) रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. दुपारी 12 वाजता जुहू हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत येणार होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि खराब वातावरण यामुळे त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला आहे. वाचा : सोलापुरात एसटीचा भीषण अपघात, बस रस्त्यावरुन थेट शेतात कोसळली, घटनास्थळावरचा VIDEO सांगली जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर टेकऑफ साठी अडचणी निर्माण झाल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सांगली जिल्हा दौरा रद्द झालेला आहे. सुभाषनगर येथे होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आलेली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Maharashtra News, Rain, Sangli, Weather forecast

पुढील बातम्या