प्रमोद पाटील, रायगड : मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात थैमान घातलं आहे. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे सावित्री आणि पाताळगंगा या दोन्हीही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय. Weather Update : राज्यात आज अतिमुसळधार पाऊस; पुण्यासह या 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट सावित्री नदीला आला पूर मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर आला आहे. नदीने धोका पातळी ओलांडली असून ती सकाळी सात वाजता 6.50 मीटरवर वाहतेय. त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. कर्जत खालापूर परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोका पातळी ओलांडली आहे. ही मौजे लोहप येथे 21.52 मीटरवर वाहतेय. आपटा, रसायनी परिसरात नदीचे पाणी सखल भागात शिरण्यास सुरुवात झाली आहे. आपटा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Ratnagiri News: रत्नागिरीत वाढला पावसाचा जोर! जगबुडी, नारंगी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी अनेक घरांमध्ये शिरलं पाणी ठिकठिकाणी पाणी शिरलं असल्याने दळणवळणही विस्कळीत झालं आहे. यासोबतच जोरदार पावसामुळे परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. अनेकांच्या घरात मध्यरात्री पाणी शिरल्याने त्यांची तारांबळ उडाली. जागोजागी पाणी साचलं असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांचे शेतंही पाण्याखाली गेले असल्याने शेतकरीराजा ही चिंतेत आहे.