जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ratnagiri News: रत्नागिरीत वाढला पावसाचा जोर! जगबुडी, नारंगी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

Ratnagiri News: रत्नागिरीत वाढला पावसाचा जोर! जगबुडी, नारंगी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

खेडमधील नारंगी आणि जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

खेडमधील नारंगी आणि जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Ratnagiri News: कोकणात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान खेडमधील जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे येथील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत बनकर, रत्नागिरी, 19 जुलै : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान खेडमधील जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शहरातील सफा मशीद चौकात शिरलेय. एवढंच नाही तर खेडच्या मटण मच्छी मार्केटचा संपर्क देखील तुटला आहे. नदीकाठच्या व खाडीपट्ट्यातील अनेक गावांचे रस्ते पाण्याखाली गेले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. अनेकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं आहे.

जाहिरात

दळणवळण ठप्प पुराच्या पावसामुळे हेड दापोली आणि मंडणगड यातून तालुक्याला जोडणारा खेड दापोली या मुख्य राज्यमार्गावर खेड नजीक एकविरा नगर या परिसरात सहा ते सात फूट पाणी साचलेय. यामुळे खेडचा दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्याचा संपर्क तुटलाय. त्याचबरोबर खाडीपट्टा विभागातील 25 ते 30 गावांचा संपर्क देखील तुटलाय. पहाटे हे पाणी भरल्यामुळे एसटी बस सेवा तसेच इतर वाहन देखील या मार्गावरून जात नाहीयेत. यामुळे दळणवळण ठप्प झालेय. Weather Update : राज्यात आज अतिमुसळधार पाऊस; पुण्यासह या 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट

News18

मच्छी मार्केटमध्ये शिरले पाणी जोरदार पाऊस सुरु असल्याने जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नदीकाठचे रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत. मच्छी मार्केटचा देखील संपर्क तुटला आहे. मच्छी मार्केट परिसरातील जवळपास 30 ते 35 दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे दुकानदार आणि व्यापारी यांची आपले सामान सुरक्षित हलवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

News18

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नगर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा खेडच्या नागरिकांना दिला आहे. यासोबतच दुसऱ्या बाजूला नारंगी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. खाडीपट्टा विभागात जोडणारी अनेक गावांना जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचा संपर्क तुटला आहे. Gadchiroli News : पुरातून महिंद्रा पिकअप काढण्याचं नसतं धाडस अंगलट; ऐनवेळी तिघांनी मारली उडी, Video व्हायरल

News18

शेतकरी पुन्हा संकटात अतिपावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय. कारण पावसाची चाहूल लागताच बळीराजाने पेरणी केली होती. मात्र जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्याची हजारो एकर भात शेती देखील पाण्याखाली गेलेली आहे. नारंगी नदीकाठच्या अनेक वीट भट्या देखील पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळतेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात