मुंबई, 5 जुलै : राष्ट्रवादीतील बंडानंतर आता बुधवारी दोन्ही गटांच्या वतीनं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाच्या वतीनं बैठका घेत आमदार आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, यात अजित पवारांची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण, अजित पवार गटाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे आमदार कुणासोबत? याचा संभ्रम निर्माण झाला, याची पहिली चाचपणी बुधवारच्या दोन्ही गटाच्या बैठकांमधून करण्यात आली. ज्यात राष्ट्रवादीच्या 40 हून जास्त आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या आमदारांमध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत, तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे. विशेष म्हणजे बुधवारच्या बैठकीतही अजित पवार गटाच्या वतीनं जोरदार शक्तिप्रदर्शन करत, सर्वाधिक आमदार आपल्याच सोबत असल्याचा दावा करण्यात आला. अजित पवार शिंदेंच्या एक पाऊल पुढे, शपथविधीआधीच केला करेक्ट कार्यक्रम! दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केवळ 13 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. बुधवारच्या बैठकीतही अजित पवारांच्या तुलनेत कमीच आमदारांना वाय.बी.चव्हाण सेंटरला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. पण, शरद पवारांनी मात्र अजित पवारांसोबत असलेले आमदारही आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. एकंदरीतच, राष्ट्रवादीतील पॉवरगेमच्या पहिल्या फेरीत तरी पुतण्यानं काकावर सरशी केल्याचं पाहायला मिळतंय. बैठकीनंतर अजित पवार समर्थक सर्वच आमदारांना आता ताज लँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय, त्यामुळे आता अजित पवार गटाचे आमदार फुटण्याची शक्यता कमी झाली आहे, त्यामुळे आता शरद पवार नेमकी कोणती खेळी करतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भाजपसोबत जायचं चार वेळा ठरलं, प्रत्येकवेळी काय झालं? अजित पवारांनी बॉम्ब फोडले!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







