Home /News /maharashtra /

आव्हाड-मुंडेंचं मौन, अजितदादा-भुजबळ क्वारंटाईन, राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय?

आव्हाड-मुंडेंचं मौन, अजितदादा-भुजबळ क्वारंटाईन, राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय?

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार गोत्यात आलं आहे. राज्यात एकीकडे हे सत्तानाट्य सुरू असताना धनंजय मुंडे कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

    मुंबई, 28 जून : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार गोत्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आव्हानापासून ते आवाहनापर्यंतची भाषा वापरून शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट एकनाथ शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. एकनाथ शिंदे गटामध्ये असलेल्या सगळ्याच आमदारांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसबाबतची (NCP) नाराजी उघडपणे बोलून दाखवली. एकीकडे राज्यामध्ये हे सत्तानाट्य घडत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडही (Jitendra Awhad) यावर फार बोलताना दिसले नाहीत. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांना याबाबत विचारण्यात आलं, पण त्यांनी कोपरापासून हात जोडत बोलायला नकार दिला. अजित पवार-भुजबळ क्वारंटाईन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ते क्वारंटाईन झाले आहेत. पण त्याआधी अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटामागे भाजपचा हात दिसत नाही, असं वक्तव्य केलं, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यानंतर शरद पवारांनी या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचं सांगत अजित पवारांचा मुद्दा खोडून काढला. या वक्तव्याबाबत अजितदादांना विचारण्यात आलं असता, शरद पवारांचा शब्द अंतिम असतो, त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवार मुंबईमध्ये दिल्लीमध्ये काल यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचा अर्ज भरला तेव्हा शरद पवार (Sharad Pawar) तिकडे उपस्थित होते. यानंतर ते संध्याकाळी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर शरद पवारांनीही सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकाही घेतल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: NCP, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या