मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

17 जणांच्या पाठिंब्यावर शिवसेनेने गटनेता ठरवला, पण नवा पेच निर्माण होणार?

17 जणांच्या पाठिंब्यावर शिवसेनेने गटनेता ठरवला, पण नवा पेच निर्माण होणार?

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर (Vidhan Parishad Election) महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात भूकंप झाला आहे. शिवसेनेचे (Shivsena) बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 21 जून : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर (Vidhan Parishad Election) महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात भूकंप झाला आहे. शिवसेनेचे (Shivsena) बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड केलं आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे सूरतला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 29 आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, पण माध्यमांमध्ये आलेल्या काही वृत्तांनुसार एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याचंही सांगितलं जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेनेही त्यांच्यावर पहिली कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिंदेंऐवजी आता अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांची शिवसेनेने गटनेतेपदी नियुक्ती केली, पण यावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अजय चौधरी यांची शिवसेनेने गटनेतेपदी नियुक्ती केली आहे, पण यासाठी त्यांनी विधीमंडळाला 17 आमदारांच्या सह्या दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याकडे 29 ते 35 आमदार असतील आणि या आमदारांनी जर एकनाथ शिंदे यांच्यासाठी गटनेतेपदाच्या समर्थनाचं पत्र विधीमंडळाला दिलं, तर मात्र नवा पेच निर्माण होऊ शकतो.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. अशा पद्धतीने गटनेते पदावरून हटविण्याचा कायदा नसल्याचं मत मुनगंटीवार यांनी मांडलं आहे. तसंच सध्या शिवसेनेच्या जवळ आमदारांची संख्याच नाही,त्यामुळे अशी कृती करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray