जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sharad Pawar Poster : स्वत:चा फोटो न वापरण्याची सूचना करण्याचा शरद पवारांना अधिकार आहे? पाहा कायदा काय सांगतो, Video

Sharad Pawar Poster : स्वत:चा फोटो न वापरण्याची सूचना करण्याचा शरद पवारांना अधिकार आहे? पाहा कायदा काय सांगतो, Video

Sharad Pawar Poster : स्वत:चा फोटो न वापरण्याची सूचना करण्याचा शरद पवारांना अधिकार आहे? पाहा कायदा काय सांगतो, Video

आपला फोटो वापरु नये अशी सूचना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाला केलीय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 जुलै : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला गेल्या काही दिवसांमध्ये नवं वळण लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडलीय, अजित पवार आणि शरद पवार यांचे गट एकमेकांच्या विरुद्ध उभे टाकलेत. अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर आता खुद्द शरद पवारांनीच आक्षेप घेतलाय. आपला फोटो वापरू नये, अशी स्पष्ट सूचना शरद पवारांनी केलीय. एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे सूचना करण्याचा अधिकार आहे का? शरद पवारांनी केलेली सूचना कायदेशीर आधार आहे का? हा आदेश मोडणाऱ्या अजित पवार यांच्या गटावर कारवाई होऊ शकते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत.

News18लोकमत
News18लोकमत

मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ यज्ञेश कदम यांनी याबाबत माहिती दिलीय. ‘एखादी व्यक्ती स्वतःला सामाजिक किंवा सार्वत्रिक चळवळीत स्वतःला वाहून घेते. सामाजिक कार्य करते त्यावेळी त्यांचे चाहते, त्यांना विचारणारा वर्ग त्या व्यक्तीचा फोटो नक्कीच वापरु शकतो. साहेबांना वाईट वाटलं असेल, पण…वसंतदादा ते धनंजय मुंडे, छगन भुजबळांनी इतिहासच काढला त्याचवेळी एखादी व्यक्ती आपला फोटो वापरू नका असं सांगू शकते. त्या व्यक्तीला तो संपुर्ण अधिकार आहे. यावेळी कायदा संबंधित व्यक्तीला संरक्षण देतो, समोरच्या व्यक्तींना तशी सूचना देऊ शकतो, असं कदम यांनी स्पष्ट केलंय. काय दिली होती सूचना? माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षाने माझा फोटो वापरवा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये,’ अशी सूचना शरद पवार यांनी दिली होती.  या सूचनेला कायदेशीर आधार असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात