मुंबई, 5 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर दोन्ही गटाकडून मुंबईत बैठक पार पडत आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. पवारांनी पुलोद सरकार स्थापन केलं, नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला तर आम्ही भाजपसोबत गेलो तर काय चुकलं? असा प्रश्न अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. या सर्व आरोपांना शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. काय म्हणाले शरद पवार? आजची बैठक ऐतिहासिक आहे संबध देशाचे लक्ष लागले आहे चर्चा आहे. 24 वर्षापूर्वी मुंबईत राष्ट्रवादीचा जन्म झाला. शिवाजी पार्कवर स्थापना केली. 24 वर्षे झाली. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी निर्माण करण्यात यश आले. अनेक मंत्री, आमदार, खासदार झाले. सामान्य माणूस राज्य चालवू शकतो हे राष्ट्रवादीमुळे समजले. अनेक नवीन नेते तयार केले. एकच भावना होती. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याचा. तुमच्या कष्टाने आपण यशस्वी झालो आज पुढे जायचे आहे संकटे खूप आहेत. जनतेची भावना वेगळी असेल तर मार्ग काढणे हे सूत्र होते परंतु हे बदलले आहे. सुसंवाद राहिला नाही. सामान्य माणसाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद ठेवावा लागतो ते दुरुस्त केले पाहिजे आज तो संवाद नाही आम्ही सत्ताधारी नाही. सर्व राज्यात अस्वस्थता आहे. प्रयत्न सुरू केले लोकशाही टिकवण्यासाठी संवाद सुरू केला सत्ताधारी पक्षात नाही त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पंतप्रधानांनी राष्ट्र वादिवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. बारामतीच्या सभेत प्रशासन चालवायचे हे पवारसाहेबांचे बोट धरुन शिकलो. नंतर आले तेव्हा टिका केली. नुसते आरोप करुन चालणार नाही जर चुका असेल तर कारवाई केली पाहिजे. देशाचा नेता जनसामान्यांच्या समोर बोलतो तेव्हा राष्ट्रवादी इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर याचा अर्थ आधार नसलेल्या गोष्टी बोलत आहेत. वाचा - सर्व समर्थक आमदारांसाठी अजित पवारांनी टाकला मोठा डाव; शिंदेंच्या पावलावर टाकलं पाऊल सत्ताधारी आमदार खासदार खाजगीत सांगतात. आज काही लोकांनी बाजुला जाण्याची भूमिका घेतली त्याचे दु:ख आहे. ज्यांनी घाम गाळून चांगले दिवस आणले त्यांना विश्वासात न घेता पक्षाला विश्वासात घेतले नाही हे योग्य नाही. नाशिकला पक्षाच्या कार्यालयात ताबा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? उद्या कुणीही उठेल मी राष्ट्रवादीचा आहे सांगेल ते ताब्यात घेणे योग्य नाही. टिळकभवन आमच्याकडे होते आम्ही ते हिसकावून घेतले नाही. पोलिसांची मदत घेतात. घड्याळ आमचे त्यावरील खूण आमची आहे. कोण कुठे जाणार नाही. माझ्या राजकीय जीवनात अनेक निवडणुका लढलो आहे. कोण सांगत असतील चिन्ह घेऊ. पण एक सांगतो चिन्ह जाणार नाही, ते मी जाऊ देणार नाही. आज मुंबईभर माझा फोटो लावला आहे. त्यांना माहीत आपलं नाणं चालणार नाही. त्यांचे नाणं खरं नाही ते खणकन वाजणार नाही. वाचा - ‘तुम्ही थांबणार आहात की नाही’ अजितदादांचा थेट शरद पवारांना सवाल पांडुरंग म्हणायचं गुरु मानायचं आणि दुर्लक्ष झालं म्हणायचं. छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना कसे मंत्री केले याची माहिती शरद पवार यांनी दिली. राज्यकर्ते असे असले पाहिजे. आज उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. वेगळा विदर्भ केला पाहिजे त्याशिवाय मी हे करणार नाही, आज वेगळा विदर्भ लक्ष घातले नाही. आज आपले लोक गेले. 10 दिवसांपूर्वी भाषण ऐकले असला मुख्यमंत्री पाहिला नाही आणि त्या असल्या मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत.
पुलोदचा प्रयोग आणीबाणीच्या काळात सर्वांनी घेतला. भाजप सोबत गेलो तर चुकलो काय? असा प्रश्न अजित पवार गट विचारत आहे. नागालँडमध्ये सरकारमध्ये गेलो. पण आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. जे जे लोक भाजप सोबत गेला त्यांचा काय झालं सर्वांनी पाहिले आहे. जनतेनी त्या लोकांना उध्वस्त केले आहे.

)







