जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Political Crisis : सर्व समर्थक आमदारांसाठी अजित पवारांनी टाकला मोठा डाव; शिंदेंच्या पावलावर टाकलं पाऊल

Maharashtra Political Crisis : सर्व समर्थक आमदारांसाठी अजित पवारांनी टाकला मोठा डाव; शिंदेंच्या पावलावर टाकलं पाऊल

अजित पवारांनी टाकला मोठा डाव

अजित पवारांनी टाकला मोठा डाव

Pawar vs Pawar Maharashtra Political Crisis updates : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी खेळी खेळत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या बैठका आज मुंबईत होत आहे. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडले आहेत. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केला आहे. दरम्यान, आता फोडाफोडीचं राजकारण होऊ नये यासाठी अजित पवार शिंदे गटाची स्टाईल वापरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आता आपले समर्थक आमदार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे फोडाफोडीच राजकारणाला पेव फुटू शकते. अशात खबरदारीचा उपाय म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे सगळे आमदार हॉटेल ताजमध्ये ठेवणार आहे. 2/3 संख्या पूर्ण होईपर्यंत या सगळ्या आमदारांना एकत्र ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. वाचा - ‘तुम्ही थांबणार आहात की नाही’ अजितदादांचा थेट शरद पवारांना सवाल संघर्ष निवडणूक आयोगासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने त्यांच्या समर्थनार्थ आमदार-खासदारांची 40 हून अधिक प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) गटबाजी निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. शरद पवार कॅम्पने निवडणूक प्राधिकरणाकडे कॅव्हेट दाखल केले असून गटबाजीच्या संदर्भात कोणतेही निर्देश देण्यापूर्वी प्रथम त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

News18लोकमत
News18लोकमत

40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आम्ही सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे. 40 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत आहेत, असे अनिल पाटील म्हणाले. तर सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही त्यामुळे इथे आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील 95 टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. तसेच 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात