• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Maharashtra Political Crisis Live Updates: मुख्यमंत्र्यांनी अखेर वर्षा बंगला सोडला, शिवसैनिकांसाठी भावूक क्षण

Maharashtra Political Crisis Live Updates: मुख्यमंत्र्यांनी अखेर वर्षा बंगला सोडला, शिवसैनिकांसाठी भावूक क्षण

Maharashtra government political crisis: महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपाचे मिनिटा मिनिटाचे अपडेट्स LIVE

 • News18 Lokmat
 • | June 22, 2022, 21:51 IST
  LAST UPDATED 4 DAYS AGO

  हाइलाइट्स

  23:9 (IST)

  मंत्री अनिल परबांची ईडीकडून चौकशी
  अनिल परबांची ईडीकडून 7 तास चौकशी
  उद्या चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना
  'साई रिसॉर्टबाबतची कागदपत्रं घेऊन यावं'
  मी चौकशीत सहकार्य करतोय - अनिल परब
  'सेनेचा जन्म संघर्षासाठीच झालाय आणि तो करेल'

  23:9 (IST)

  मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर नॉट रिचेबल
  एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती

  23:0 (IST)

  उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांनंतर 'वर्षा' सोडलं
  ठाकरे कुटुंबीय 'वर्षा'वरून 'मातोश्री'वर
  ठाकरेंचं शिवसैनिकांकडून जागोजागी स्वागत
  उद्धव ठाकरेंवर कार्यकर्त्यांकडून फुलांचा वर्षाव
  आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आहोत - शिवसैनिक
  उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी

  22:47 (IST)

  मंत्री अनिल परबांची ईडीकडून चौकशी
  अनिल परबांची ईडीकडून 7 तास चौकशी

  21:54 (IST)

  - शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते ठिकठिकाणी थांबले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर सचिन अहिर आहेत. सह्याद्री जवळ उद्धव ठाकरे यांना कार्यकर्ते अडवत आहे.

  21:50 (IST)

  - मुख्यमंत्र्यांनी अखेर वर्षा बंगला सोडला, शिवसैनिकांसाठी भावूक क्षण, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील मुख्यमंत्र्यांसह मातोश्रीच्या दिशेला रवाना, शिवसैनिकांची प्रचंड घोषणाबाजी

  21:49 (IST)

  उद्धव ठाकरेंनी 'वर्षा' निवासस्थान सोडलं
  मुख्यमंत्री ठाकरे 'मातोश्री'कडे रवाना
  उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब
  'वर्षा' बंगल्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी
  शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव

  21:4 (IST)

  - शिवसेना आमदार सदा सरवणकर सुद्धा गुहावटीला निघाल्याची माहीती 

  - माहीम दादर विधानसभेचे सदा सरवणकर आमदार 

  - सदा सरवणकर नॉट रिचेबल

  20:50 (IST)

  एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीत
  गुलाबराव पाटील गुवाहाटीमध्ये दाखल
  गुलाबराव पाटील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये
  योगेश कदम, मंजुळा गावित गुवाहाटीत
  अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील गुवाहाटीत

  20:41 (IST)

  खासदार संजय राऊत वर्षा बंगल्यावर
  मुख्यमंत्री आज मातोश्रीवर जाणार - राऊत
  आमचा संघर्ष सुरूच राहणार - संजय राऊत
  उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार - राऊत
  'अविश्वास ठराव मांडल्यास बहुमत सिद्ध करू'
  पवारांकडून कोणताही सल्ला नाही - राऊत

  महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपाचे मिनिटा मिनिटाचे अपडेट्स LIVE