मुंबई, 11 मे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे, तसंच राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं चुकीचं होतं. बहुमत चाचणी बोलावताना राज्यपालांनी वस्तूस्थिती तपासली नाही, अशा कडक शब्दांमध्य कोर्टाने तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर भाष्य केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी तेव्हा जे पाऊल उचललं ते विचारपूर्वक उचललं होतं. कुणी माझ्याकडे राजीनामा घेऊन आलं असेल तर मी राजीनामा देऊ नको, असं म्हणायचं होतं का? सुप्रीम कोर्टाने जे म्हणलं आहे, त्याची व्याख्या करणं त्याचं विश्लेषण करणं विश्लेषकाचं काम आहे, माझं काम नाही’, असं भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बहुमताच्या चाचणीला सामोरं न जाता राजीनामा दिला आहे, त्यामुळे आम्ही पूर्वस्थिती आणू शकत नाही, असंही सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये सांगितलं आहे.
#WATCH | Former Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari reacts on Supreme Court verdict on Uddhav Thackeray vs Eknath Shinde
— ANI (@ANI) May 11, 2023
Supreme Court has said that the then Maharashtra Governor had acted against the law. pic.twitter.com/EgaT8yDrWY
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. राज्यपालांची भूमिका अयोग्य होती, राज्यपालांच्या भूमिकेचं वस्त्रहरण झालं आहे. राज्यपाल आदरयुक्त यंत्रणा होती, पण त्याचे धिंदवडे काढले जात आहेत. ही यंत्रणा अस्तित्वात ठेवावी का नाही, याचा विचार सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायला पाहिजे. राज्यपाल 12 वाजवून जातील आणि मग म्हणतील हा संत माणूस आहे, मग करायचं काय? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 16 आमदारांच्या निर्णयाला किती वेळ लागणार? विधानसभा अध्यक्षांनी थेट लंडनहून सांगितली प्रक्रिया मी राजीनामा दिला नसता तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो, पण माझ्यासाठी लढत नाहीये. माझी लढाई राज्यासाठी आणि देशासाठी आहे. कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला ही चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने, माझ्या वडिलांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? अशा लोकांना मला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. ज्यांनी माझ्या पक्षातून सगळं घेतलं आणि गद्दारी केली, गद्दार लोकांनी माझ्यावर अविश्वास प्रस्ताव आणायचा आणि मी त्याचा सामना करायचा, हे मी कसं करू? विश्वासघात करणाऱ्यांकडून अविश्वासदर्शक ठरावाबाबत विचारलं जात असेल तर ते अयोग्य आहे. थोडी नैतिकता असेल तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, जसा मी दिला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ’…तेव्हा आमचे मित्र नाराज झाले पण,’ सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पवारांचं ठाकरेंच्या वर्मावर बोट