जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ शिंदेंना कोर्टाचा मोठा दणका, भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर

एकनाथ शिंदेंना कोर्टाचा मोठा दणका, भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर

शिंदेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का

शिंदेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का

सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन सुरू आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 11 मे :  सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन सुरू आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्यात आला आहे. भरत गोगावले यांची मुख्य प्रतोतपदी केलेली नियुक्ती  बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. याचबरोबर आम्हीच खरी शिवसेना असा दावा कोणीही करू शकत नाही असंही यावेळी कोर्टाने म्हटलं आहे. हा एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल  पुन्हा लांबणीवर पडला आहे. नबाम राबिया प्रकरण या खटल्यात लागू होत नाही, असं नमूद करत या खटल्याबाबतचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे जरी सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री शिंदेंवर ताशेरे ओढले असले तरी देखील शिंदेंनाच मोठा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

या 16 आमदारांवर टांगती तलवार एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात