• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • महाराष्ट्र पोलीस दलाचा पुन्हा Everest वर झेंडा, सांगलीच्या पोलिसांने करून दाखवलं!

महाराष्ट्र पोलीस दलाचा पुन्हा Everest वर झेंडा, सांगलीच्या पोलिसांने करून दाखवलं!

Sambhaji Gurav completed everest mission दोन प्रयत्न फसल्यानंतर तिसऱ्यांदा संभाजी गुरव यांना एव्हरेस्ट मोहीम सर करण्यात यश मिळालं आहे.

  • Share this:
    सांगली, 24 मे : पोलिस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) संभाजी गुरव (Sambhaji Gurav) यांनी अत्यंत कठीण असलेल्या एव्हरेस्ट शिखराला (Mount Everest) गवसणी घातली आहे. एव्हरेस्ट सर करणारे ते सांगली (Sangali) जिल्ह्यात्या वाळवा तालुक्यातले पहिले व्यक्ती ठरले आहेत. महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) खात्यातील फक्त दोघांना त्यांच्यापूर्वी ही कामगिरी जमली आहे. (वाचा-राज्यपाल पदावरून हटवल्यानंतर तुम्हाला तुरुंगात डांबणार;TMC खासदार कल्याण बॅनर्जी) सांगलीचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी जगातील सर्वोच्च पर्वतरांग असलेल्या 8848 मीटर उंच एव्हरेस्ट शिखर सर केलं. संभाजी गुरव यांनी 2019 मध्ये सर्वात आधी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर सर्व साहित्य बरोबर असूनही तब्येतीनं साथ दिली नाही म्हणून त्यांना एव्हरेस्ट मोहीम अर्ध्यावर सोडून घरी परतावं लावलं होतं. पण त्यांनी एव्हरेस्ट सर करायचा निर्धार केला होता. त्यामुळं त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवलं. (वाचा-राजभवनाबद्दल भुताटकी शब्द वापरणे हा पोरखेळपणा, फडणवीसांचा राऊतांवर पलटवार) त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केला पण त्यातही त्यांना अपयश आलं. त्यानंतर गेल्या महिन्यात पुन्हा संभाजी गुरव एव्हरेस्ट सर करण्याच्या उद्देशानं निघाले. यावेळी एव्हरेस्टचं शिखर गाठायचंच असा निर्धार त्यांनी केला. गेल्या महिन्यात म्हणजे ६ एप्रिलला ते मुंबईहून निघाले. त्यानंतर संपूर्ण मोहीम यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी अखेर 23 एप्रिल 2021 रोजी एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा पुन्हा एकदा फडकावला. तिसऱ्या प्रयत्नात त्यांचं एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांच्या या यशावर वाळवा तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर असलेले संभाजी गुरव सध्या मुंबई पनवेल इथं कार्यरत आहेत. धाडसी व्यक्तिमत्व म्हणून पोलीस खात्यामध्ये त्यांच्याकडं पाहिलं जातं. त्यांच्यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांच्या सुहेल शर्मा आणि रफीक शेख यांनीही एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published: