• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राज्यपालांना सोडणार नाही; पदावरून जाताच तुरुंगात डांबणार; TMC खासदाराची थेट धमकी

राज्यपालांना सोडणार नाही; पदावरून जाताच तुरुंगात डांबणार; TMC खासदाराची थेट धमकी

TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांच्या विरोधात लोकांनी गुन्हा दाखल करावा, असं आवाहन केलं आहे, एवढंच नाही तर राज्यपालांना पदावरून हटवल्यानंतर तुरुंगात पाठवण्याची धमकीही दिली आहे.

 • Share this:
  कोलकाता, 24 मे - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर (West Bengal governor Jagdeep Dhankhar) आणि ममता बॅनर्जी सरकार दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळत आहे. TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपाल यांच्या विरोधात लोकांनी गुन्हा दाखल करावा, असं आवाहन केलं आहे, एवढंच नाही तर राज्यपालांना पदावरून हटवल्यानंतर तुरुंगात पाठवण्याची धमकीही दिली आहे. 'आम्हाला माहीत आहे की, आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकत नाही. त्यामुळे आम्ही लोकांना आवाहन करत आहोत की, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी. राज्यपाल हिंसा आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहेत.' असं बॅनर्जी म्हणाले. एवढेच नाही तर त्यांनी राज्यपालांना पदावरून हटवल्यानंतर तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली आहे. तसंच जिथं नारदा प्रकरणातील टीएमसी आमदारांना ठेवलं आहे, त्याच प्रेसिडेन्सी जेलमध्ये राज्यपालांना ठेवलं जाईल,' असं ते म्हणाले. लोकांनी चिंता करण्याची गरज नाही, 2024 नंतर भाजपचे अनेक नेते तुरुंगात जाणार आहेत. कोरोनाची परिस्थिती हाताळू न शकणारे आणि लोकांपर्यंत कोरोनावरील लस पोहोचवू न शकलेल्यांना सत्तेवरून जावंच लागेल. भारतातील  लोक सध्या दुसर्‍या स्वातंत्र्याची वाट पाहत आहेत, असे ते म्हणाले. हे वाचा - लहान बहिणीने केलं मोठ्या बहिणीला प्रेग्नंट; गे कपलसाठी घेतला मोठा निर्णय घेणाऱ्या बहिणींची जगभर चर्चा टीएमसी खासदार बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर राज्यपाल जगदीप धनकड यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. नारदा स्टिंग केस प्रकरण राज्यपालांनी सीबीआयला हस्तांतरित केलं होतं, यानंतरच बंगाल सरकारचे दोन मंत्री सुब्रत बॅनर्जी, फिरहाद हखकिम यांच्यासह चार नेत्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. यानंतर टीएमसीने पुन्हा एकदा राज्यपाल धनकड यांच्यावर हल्ला चढवला आहे. नारदा स्कॅम प्रकरण सीबीआयकडं हस्तांतरित करण्यावरून कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांना संविधानाची हत्या करणारे म्हटलं आहे. काय आहे नारदा स्कॅम प्रकरण 2016 मध्ये बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आल्या होत्या. या टेप 2014 मध्ये रेकॉर्ड केल्याचा दावा केला गेला होता, यामध्ये टीएमसीचे मंत्री, खासदार आणि आमदारांसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती कथितपणे एका कंपनीच्या प्रतिनिधींकडून कॅश घेत असल्याचे दिसत होतं. हे स्टिंग ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केलं होतं. 2017 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयानं या टेपचा तपास करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.
  Published by:News18 Desk
  First published: