मुंबई, 20 ऑक्टोबर : राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठं गिफ्ट दिलं आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतगर्त प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाला. आज एकाच वेळेला राज्यातल्या 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. अशाप्रकारे एकाच वेळेला थेट खात्यात रक्कम जमा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हणलं आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने खचून जाऊ नये, सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अंधेरी पोटनिवडणुकीनंतर राज ठाकरेंचं आणखी एक पत्र; आताच्याही मागणीला हिरवा कंदील?
सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, खात्यात अडीच हजार कोटी जमा#EknathShinde #DevendraFadnavis pic.twitter.com/Lp4eqJjlFO
— News18Lokmat (@News18lokmat) October 20, 2022
सध्या राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने खचून न जाता धैर्याने संकटाला सामोरं जा, शासन तुमच्या पाठीशी आहे, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. पंचनाम्यासाठी जीपीएस टेक्नॉलॉजी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.