जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra NCP Political Crisis : उद्याच्या बैठकीआधी शरद पवारांनी टाकला मोठा डाव; जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही व्हीप जारी

Maharashtra NCP Political Crisis : उद्याच्या बैठकीआधी शरद पवारांनी टाकला मोठा डाव; जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही व्हीप जारी

शरद पवारांनी टाकला मोठा डाव

शरद पवारांनी टाकला मोठा डाव

Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची आणि सर्वाधिक आमदार व खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा कोणाला, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह पुकारलेल्या बंडामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी रविवारी सर्वांनाच धक्का देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर त्यांच्यासोबत इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी आम्हीच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. दुसरीकडे भाजपला पाठिंबा देण्याच्या या निर्णयाला माझं समर्थन नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांकडून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी शरद पवारांनी मोठा डाव टाकला आहे.

जाहिरात

शरद पवार यांनी टाकला मोठा डाव पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या 5 जुलै रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी, फ्रंटल सेल राज्यप्रमुख, सर्व तालुकाध्यक्ष, इतर पदाधिकारी यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे,’ असं ट्वीट राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीदेखील मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं आहे. यापूर्वी सगळ्या आमदारांना शरद पवार यांनी बैठकीला हजर राहण्यासाठी वैयक्तिक फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी पक्षाचे नवनियुक्त प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी सगळ्या आमदारांना पक्षादेश (व्हीप) जारी केला आहे. वाचा - ‘याची सुरूवात शरद पवारांनी केली, आता शेवट…’, राज ठाकरेंनी इतिहास काढला अजित पवार गटाकडूनही तयारी दुसरीकडे, अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडूनही 5 जुलै रोजीच आपल्या गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतच बोलावल्याची माहिती आहे. त्यामुळे पदाधिकारी बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं निश्चित झालं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मुळात अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार आहेत, असे त्यांचे समर्थक सांगत असले तरी ते नक्की 30 आहेत की त्यापेक्षा अधिक आहेत की कमी आहेत हे उद्या स्पष्ट होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात