मुंबई 08 ऑगस्ट : राज्यात मागील 35 दिवसांपासून फक्त 2 मंत्री आहेत. फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी होऊन आता महिना उलटून गेला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांनीही या मुद्द्यावरुन सरकारवर टीका करण्यास सुरूवात केलेली असतानाचा आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. मंत्रिमंडळ विस्तार आता उद्या सकाळी अकरा वाजता होणार असल्याचं समोर येत आहे. यासोबतच पावसाळी अधिवेशनाची तारीखही आता समोर आली आहे. BREAKING : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता 10 ऑगस्ट ते 19 ऑगस्टदरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारपासून विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, उद्या मोहरमची शासकीय सुट्टी रद्द करून विधिमंडळाचं कामकाज सुरू राहणार असल्याचंही समोर येत आहे. मंगळवारी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तीन वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे, असं सांगितलं जात आहे. विधिमंडळात सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे. BREAKING : सरकारमध्ये ‘मिस्टर क्लिन’ नेत्यांना संधी, शिंदे गटातील 2 जणांचा पत्ता कट? मंत्रिमंडळ विस्तारालाही मुहूर्त मिळाला - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी नुकतीच दिल्लीवारी केली आहे. आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या मंगळवारी सकाळी विस्तार होण्याची शक्यता आहे. विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.