मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : सरकारमध्ये 'मिस्टर क्लिन' नेत्यांना संधी, शिंदे गटातील 2 जणांचा पत्ता कट?

BREAKING : सरकारमध्ये 'मिस्टर क्लिन' नेत्यांना संधी, शिंदे गटातील 2 जणांचा पत्ता कट?

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी बैठक सुरू

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी बैठक सुरू

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी बैठक सुरू

    मुंबई, 08 ऑगस्ट : शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना संधी दिली जाईल, त्यामुळे शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. ( Shinde governments cabinet expansion) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये  मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असून मंगळवारी सकाळी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घड़ामोड़ीमुळे काही नावावर फेरविचार होऊ शकतो. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असाचा अशी दोघांची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचे नाव कापले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींचा नाव टीईटी परीक्षा घोटाळ्यात समोर आली आहे. त्यामुळे सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. सत्तार यांच्यासोबत संजय शिरसाट याचे नावही समोर आले आहे. आजच शिंदे सरकारकडून राज्यपालांना मंत्र्यांच्या शपथविधीबद्दल माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच, पावसाळी अधिवेशन हे 10 ते 18 तारखेदरम्यान बोलावले जाण्याची माहितीही समोर आली आहे. (आलियाच्या पोटी जन्म घेणार ऋषी कपूर? अभिनेत्रीची डिलिव्हरी डेट आली समोर) दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. फडणवीस यांनी दिल्लीत जावून भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. फडणवीस यांची गेल्या महिन्याभरात अनेक दिल्ली वाऱ्या झाल्या आहेत. या दरम्यान त्यांची अनेकवेळा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाली. पण मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी द्यावं, यावर पक्षश्रेष्ठींसोबत एकमत होत नव्हतं, अशी चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींना महाराष्ट्रात आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पॅटर्न अवलंब करायचा आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. (Floating City : जगातील पहिलं तरंगतं शहर, हॉटेल, मॉल आणि घरंही असणार पाण्यावर) पण गुजरात पॅटर्ननुसार सर्वच नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर राज्य कारभार करण्यास पुढे अडचणी येऊ शकतील. त्यामुळे काही नवे चहरे आणि काही जुने चेहरे यांच्यातील समन्वय साधून विस्तार करण्यात यावा, अशी फडणवीसांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांसकडून मिळाली आहे. . पण त्या यादीत नेमके कुणाकुणाची नावे आहेत ते अद्याप समजू शकलेलं नाही. या दरम्यान भाजप पॅटर्नच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रात भाजप पॅटर्न जर अवलंबला गेला तर राज्यातील अनेक भाजपच्या बड्या नेत्यांना धक्का बसू शकतो. पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय त्याबाबत झाला असेल तर तो निर्णय मान्य करणं त्यांच्यासाठी अनिवार्य राहील.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या