Home /News /maharashtra /

धक्कादायक! गेल्या 3 दिवसांत मंत्रालयातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

धक्कादायक! गेल्या 3 दिवसांत मंत्रालयातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

मुंबई, 8 जुलै: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत हजारांनी वाढ होत आहे. राज्यात राज्यात गेले काही दिवसांपासून 6000 वर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, गेल्या 3 दिवसांत मंत्रालायातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हेही वाचा...MASK नाही घातला तर काय? VIDEO पाहाल तर तुम्ही चेहऱ्यावरील मास्क कधीच हटवणार नाही मृत कर्मचाऱ्यांमध्ये विधिमंडळ मंडळातील क्लार्क, जलसंपदा विभागातील क्लार्क आणि नगर विकास विभागाचा मंत्री कार्यालयातील शिपाईचा समावेश आहे. मिळालेली माहिती अशी की, गेल्या 2 आठवड्यापासून तिघे कर्मचारी आजारी होते. आजारी पडण्याआधी तिघे मंत्रालयात ड्युटी करत होते. मात्र, तिघांवर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आता मंत्रालयातील कामगार विभागात शिपाईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. दरण्यान, राज्यात गेल्या 24 तासांत 5134 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 217181 एवढी झाली आहे. तर 3296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 118558 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 89313 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील 24 तासांत 224 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 9250 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत तब्बल 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 22752 नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 742 417 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 20 हजारांहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा...हवेतून पसरणाऱ्या कोरोनाला घाबरायची गरज नाही, शास्त्रज्ञांनी आणला खास 'फिल्टर' कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले होते. पहिला हॉटस्पॉट जिल्हे (रेड झोन) , दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे (ऑरेंज झोन) आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या