या व्हिडीओत आपण पाहू शकतो सुरुवातीला व्यक्ती मास्क न घालता फक्त जोरात बोलते, त्यावेळी तिच्या तोंडातून किती ड्रापलेट्स निघतात. हे ड्रॉपलेट्स एका विशिष्ट प्रकाशात स्पष्ट दिसून येतात. उघड्या डोळ्यांनी ते आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. फक्त एखादी व्यक्ती बोलताना इतके ड्रॉपलेट्स तिच्या तोंडातून निघत असतील मग ती शिंकताना आणि खोकताना किती असतील याची कल्पना आपण करूच शकतो. हीच व्यक्ती नंतर जेव्हा मास्क घालते तेव्हा आपण पाहू शकतो की तिच्या तोंडातून ड्रापलेट्स मास्कमधून बाहेर येत नाहीत. हे वाचा - हवेतूनही पसरू शकतो कोरोना; कसा कराल स्वत:चा बचाव सध्या लोक सर्जिकल किंवा घरगुती बनवलेलं कापडी मास्कही वापरत आहेत. असे वेगवेगळे मास्क घातल्याने काय फरक पडू शकतो हेदेखील या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. सर्वसामान्य मास्क आणि कापडी मास्कमध्ये फारसा फरक नाही. मास्क कोणताही असला तरी ड्रॉपलेट्स हवेत पसरण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे मास्क कोणताही असो तो घालणं महत्त्वाचं आहे हे यातून दिसून येतं. शिवाय काही लोकांना मास्क घालण्याची योग्य पद्धत माहिती नाही. मास्क घातला तरी त्यातून ड्रॉपलेट्स बाहेर येऊ शकतात जर तो मास्क योग्यप्रकारे घातला नसेल तर त्यामुळे मास्क कसा घालावा हेदेखील या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. हे वाचा - हवेतून पसरणाऱ्या कोरोनाला घाबरायची गरज नाही, शास्त्रज्ञांनी आणला खास 'फिल्टर' आपल्याला खोकला, सर्दी नाही त्यामुळे आपल्याला मास्क घालण्याची गरज नाही असं अनेकांना वाटतं. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हवेतूनही पसरू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती फक्त शिंकताना, खोकताना तोंडातून बाहेर येणाऱ्या थेंबावाटेच नव्हे तर संक्रमित व्यक्ती बोलताना, तसंच तिच्या श्वासोच्छवासामार्फतही व्हायरस हवेत पसरू शकतात आणि हे व्हायरस बराच काळ हवेत राहू शकतात. त्यामुळे अशी व्यक्ती आणि अशा हवेच्या संपर्कात आल्यास कोरोनाव्हायरसचा धोका आहे. त्यामुळे संक्रमित आणि निरोगी अशा प्रत्येक व्यक्तीने मास्क घालणं गरजेचं आहे. संक्रमित व्यक्तीने मास्क घातल्याने संक्रमण पसरण्याचा धोका कमी होतो तर निरोगी व्यक्तीने मास्क घातल्याने त्याला संक्रमण होण्याचा धोका कमी होतो. हे वाचा - पहिल्यांदाच एका दिवसात झाल्या 2.5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या त्यामुळे किमान हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही तरी आता मास्क घाला आणि तुमच्या आसपासच्या ज्या व्यक्ती मास्क घालत नाहीत त्यांना ही बातमी नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मास्कचं महत्त्व पटेल.Microdroplets are concerning when you watch this video under special light. All the more reason for masks. #COVID19 pic.twitter.com/XX32OkyMuy
— Eric Feigl-Ding (@DrEricDing) July 7, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus