Home /News /maharashtra /

ठाकरे सरकारने Unlock बाबत आखला प्लॅन! वाचा कधीपासून आणि कशी होणार लॉकडाऊनमधून सूटका

ठाकरे सरकारने Unlock बाबत आखला प्लॅन! वाचा कधीपासून आणि कशी होणार लॉकडाऊनमधून सूटका

महाराष्ट्रात एक जूननंतर लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की नाही, याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार एक जूनपासून टप्प्याटप्प्याने 'अनलॉक'ची (Unlock) प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

मुंबई, 25 मे: कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) 15 एप्रिलपासून पुन्हा कडक लॉकडाउन (Coronavirus Lockdown) लागू करण्यात आला. सुरुवातीला केवळ 15 दिवसांसाठी म्हणून घोषित करण्यात आलेला हा लॉकडाउन आता एक जूनपर्यंत लागू करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (COVID-19 Positive Patients) संख्येत काहीशी घटही दिसून येत आहे. त्यामुळे एक जूननंतर लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की नाही, याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार एक जूनपासून टप्प्याटप्प्याने 'अनलॉक'ची (Unlock) प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊ लागली असल्याने, तसंच लॉकडाउन दीड महिना चालल्याने आता निर्बंध उठवले जावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार एक जूनपासून लॉकडाउनचे काही निर्बंध हटवण्याची सुरुवात करू शकते. 'अनलॉक'च्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारची दुकानं उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. कारण गेल्या वर्षीच्या लॉकडाउनच्या धक्क्यातून बाहेर यायच्या आतच यंदा पुन्हा लॉकडाउन लागू झाल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अजूनही लॉकडाउन लागू केल्यास रोष वाढण्याची शक्यता आहे. हे वाचा-'हे कसले डॉक्टर? लशीचे 2 डोस घेऊनही 1000 मेले...',रामदेव बाबांचं खळबळजन विधान तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार आणि दारूविक्रीची दुकानं उघडण्यास परवानगी देऊ शकतं, असा अंदाज आहे. तसंच, 'अनलॉक'च्या चौथ्या टप्प्यात लोकल सेवा आणि धार्मिक स्थळं, मंदिरं आदी उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते. कडक निर्बंध (Restrictions) लागू असलेल्या जिल्ह्यांतली परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, असंही सूत्रांकडून समजतं. दरम्यान, राज्यातल्या आणि देशातल्या  कोरोनाबाधितांच्या संख्येत गेले काही दिवस सातत्याने घट पाहायला मिळत आहे. रविवारी (23 मे) देशात दोन लाख 22 हजार 315 नवे कोरोनाबाधित आढळले होते. तसंच, त्या दिवशी 4454 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हे वाचा-कोरोनाची तिसरी लाट खरंच लहान मुलांसाठी घातक?आरोग्य मंत्रालयाच्या उत्तरानं दिलासा महाराष्ट्र राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार सोमवारी राज्यात 22 हजार 122 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 69 दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 56 लाख 2 हजार 19वर पोहोचली आहे. तर मृतांची आकडेवारी 89 हजार 212 वर आहे. सोमवारी 361 कोरोना रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. गेल्या तीन आठवड्यापासून महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी कमी होत आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Coronavirus cases, Lockdown, Maharashtra News

पुढील बातम्या