Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाची तिसरी लाट खरंच लहान मुलांसाठी घातक ठरणार का? आरोग्य मंत्रालयाच्या उत्तरानं दिलासा

कोरोनाची तिसरी लाट खरंच लहान मुलांसाठी घातक ठरणार का? आरोग्य मंत्रालयाच्या उत्तरानं दिलासा

लहान मुलांसाठी आता आणखी एक धोक्याची घंटा वाजलेली आहे.

लहान मुलांसाठी आता आणखी एक धोक्याची घंटा वाजलेली आहे.

काही दिवसांपासून अशा अनेक बातम्या समोर येत आहेत, की कोरोनाची तिसरी लाट (3rd Wave of Coronavirus) ही लहान मुलांसाठी घातक ठरेल. यावर आता इंडियन अकॅडमी ऑफ पेडियॉट्रिक्स (IAP) नं स्पष्टीकरण दिलं आहे.

    नवी दिल्ली 25 मे : मागील काही दिवसांपासून अशा अनेक बातम्या समोर येत आहेत, की कोरोनाची तिसरी लाट (3rd Wave of Coronavirus) ही लहान मुलांसाठी घातक ठरेल. यामागे असं कारण सांगतिलं गेलं, की पहिल्या लाटेत वृद्धांवर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला. दुसऱ्या लाटेत (2nd Wave of Covid-19) तरुणांना कोरोनानं आपल्या विळख्यात घेतलं. मात्र, आता या दोन्ही लाटेत सुरक्षित राहिलेल्या लहान मुलांनाच तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर आता इंडियन अकॅडमी ऑफ पेडियॉट्रिक्स (IAP) नं स्पष्टीकरण दिलं आहे. आयएपीच्या म्हणण्यानुसार, मुलांची मजबूत रोगप्रतिकारशक्ती (Immunity) पाहता, ही भीती चुकीची आहे. लहान मुलांना नैसर्गिकरित्याच अशी रोगप्रतिकारशक्ती मिळालेली असते की त्यांना गंभीर संसर्ग होत नाही, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते वाढून गंभीर होऊ शकतं. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं, आजपर्यंतच्या अनुभवाच्या आधारे असं म्हटलं जाऊ शकतं, की इतर दोन लाटींप्रमाणंच तिसऱ्या लाटेतही लहान मुलांना काही गंभीर संक्रमण होण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु, पालकांनी आपल्या मुलांना सुरक्षित ठेवावं. यासाठी योग्य स्वच्छतेसोबतच कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असा सल्ला त्यांनी दिला. याच विषयावर आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनीही लोकांना तिसर्‍या लाटेबाबत कोणताही चुकीचा समज करुन घेऊ नका, असं सांगितलं. यासंदर्भात सतत संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. डेटा आणि अनुभव जगातील अनेक देशांसोबत सामायिक केले जात आहेत. त्यामुळे, सावधगिरी नक्की बाळगा, परंतु काळजी करू नका. ब्लॅक फंगसवरही आरोग्य मंत्रालयानं दिली प्रतिक्रिया - आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ब्लॅक फंगस (Black Fungus) हा संसर्गजन्य आजार नाही. रोगप्रतिकारशक्ती अधिक नसणं हेच ब्लॅक फंगसचं कारण आहे. नाकात त्रास होणं, घसा दुखणं, चेहऱ्यावरील संवेदना कमी होणं तसंच पोटात दुखणे, ही ब्लॅक फंगसची लक्षणं आहेत. मंत्रालयानं म्हटलं, की याच्या वेगवेगळ्या रंगांवर लक्ष देण्यापेक्षा लक्षणांवर लक्ष दिल्यास उपचार लवकर होऊ शकतील.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india

    पुढील बातम्या