जालना, 27 सप्टेंबर : रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा आता पुढील महिन्यात होणार आहे. 24 आणि 31 ऑक्टोबरला परीक्षा Maharashtra Health Department Exam new dates) घेण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्याचबरोबर, या काळात काही लोक चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्याचं काम करताय, त्यामुळे बळी पडू नये, असं आवाहन टोपे यांनी केलं. (Health department exams will be held on 24 and 31 October)
आज जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी महाराष्ट्र आरोग्य विभागाची नवी तारीख जाहीर केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
हॉल तिकीटांमध्ये घोळ झाल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली होती. पण आता महाराष्ट्र आरोग्य विभागाची (गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे, अशी घोषणा राजेश टोपे यांनी केली आहे.
प्रत्येकाला माहिती असायल्या हव्यात अशा टॉप 10 क्रिप्टोकरन्सी'
आज दुपारी परीक्षा घेण्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर परीक्षांची तारीख ठरवण्यात आली आहे. रविवार असल्यामुळे शाळा या बंद असणार आहे. त्यामुळे सर्व शाळा या उपलब्ध असणार आहे. सर्व शाळा आणि सेंटरची यादी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी हॉल तिकीटं दिली जाणार आहे, असंही राजेश टोपेंनी सांगितलं.
तसंच, विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, काही लोक चुकीची काम करण्याचा प्रयत्न करता, काही लोक वावड्या उठवत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा अफवांना बळी पडू नये, जर कुणी असं करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही टोपे यांनी दिला.
'महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली. ही घोषणा होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी घरातून बाहेर पडले होते, काही विद्यार्थी पोहोचले होते तर काहीजण प्रवासात होते. आयत्या वेळी परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांच्या वेळेचं आणि पैशांचंही नुकसान झालं होतं. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत आज नवी तारीख जाहीर झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.