मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /स्मशानभूमीत भयानक दृश्य, अवघ्या 11 वर्षीच्या मुलीवर अघोरी प्रकार, सातारा हादरलं

स्मशानभूमीत भयानक दृश्य, अवघ्या 11 वर्षीच्या मुलीवर अघोरी प्रकार, सातारा हादरलं

धावजी पाटील या ठिकाणी आल्यावर त्यानं हिचे कपडे बदलायला लावले आणि या अघोरी प्रकारासाठी बसवलं.

धावजी पाटील या ठिकाणी आल्यावर त्यानं हिचे कपडे बदलायला लावले आणि या अघोरी प्रकारासाठी बसवलं.

धावजी पाटील या ठिकाणी आल्यावर त्यानं हिचे कपडे बदलायला लावले आणि या अघोरी प्रकारासाठी बसवलं.

सातारा, 27 सप्टेंबर :  पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरोगामी विचाराचा पगडा असलेल्या आणि थोर विचारवंतांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा (satara) जिल्ह्यात एका 11 वर्षांच्या मुलीसोबत अघोरी (black magic) प्रकार घडला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

अवघ्या अकरा वर्षाच्या मुलीला कुंकू आणि मळवट भरलेला आहे. तिच्या मांडीवर कोंबडी ठेवलेला आहे आणि तिच्यावर मांत्रिक वेगवेगळे अघोरी प्रकार करत असल्याचे हे चित्र आहे. हा सगळा  सातारा जिल्ह्यातील सुरूर इथं धावजी पाटील बुवा या देवस्थानाजवळ असलेल्या चक्क स्मशानभूमीत घडला आहे. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्याच जिल्ह्यातलं हे चित्र मन विचलित करणारे आहे.

हे कुटुंब आहे पुण्यातील हडपसर या भागातील राहणार आहे.  मुलीला लागलेली लागण ही उतरवायचे आहे म्हणून पुण्यातील मांत्रिकाने या कुटुंबाला घेऊन धावजी पाटील या ठिकाणी काल दाखल झालं. देवाचं दर्शन घेतलं.

अखेर मनसेच्या 'इंजिन'ला जोडला भाजपचा डबा, 'या' जिल्ह्यात युतीची घोषणा

या मांत्रिकानं या कुटुंबाला वाईच्या कृष्णा नदीवर घेऊन या मुलीला आंघोळ घातली. धावजी पाटील या ठिकाणी आल्यावर त्यानं हिचे कपडे बदलायला लावले आणि या अघोरी प्रकारासाठी बसवलं. स्मशानभूमीत पूजा-अर्चा सुरू असताना एका सुशिक्षित युवकाने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर पाठवला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

धावजी पाटील बुवा हे देवस्थान खऱ्या अर्थाने एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. मात्र जसं मांढरदेवी गडावर दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणची अंधश्रद्धा मोडीत काढली आहे. बाहेरून येणारे भाविक आणि मांत्रिक या ठिकाणचे नाव खराब करत असल्याचे मत इथल्या स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

पेट्रोलची टाकी फुल करुन पसार होणारा अखेर गजाआड, पैसे न देताच काढायचा पळ

2005 मध्ये मांढरदेवी गडावरील काळुबाईच्या समोर अंधश्रद्धेचे मोठा पिक होतं. सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईच्या यात्रेदरम्यान मोठे अंधश्रद्धा ही दिसून येत होती. 2005 मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर या गडावरची ही अंधश्रद्धा पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेने घेतला. मात्र या ठिकाणी बस्तान बसून असलेल्या मांत्रिकानी आपला बसतान या धावजी पाटील बुवा याठिकाणी बसवला आहे.

पूजा-अर्चा करणे, भविष्य सांगणे, करणी उतरवणे, लागण उतरवणे असे थोतांड माहिती देऊन ही मांत्रिक मंडळी भाविकांच्या खिशातील पैसे लुटण्याचे काम करू लागली. अनेक वेळेला या ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून अनेक मांत्रिकांना जेलची हवा दाखवली मात्र तरीही आजही या ठिकाणी असले अघोरी प्रकार सुरूच आहेत.

First published: