मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्यातील कोरोना निर्बंध लवकरच शिथिल होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्रालयाकडून मागितला सल्ला

राज्यातील कोरोना निर्बंध लवकरच शिथिल होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्रालयाकडून मागितला सल्ला

लोकल प्रवाशांकडे ओळखपत्र खोटे आढळल्यास त्यांच्याकडून तसंच ज्यानी खोटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांच्याकडून रु. ५००/- इतका दंड ...

लोकल प्रवाशांकडे ओळखपत्र खोटे आढळल्यास त्यांच्याकडून तसंच ज्यानी खोटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांच्याकडून रु. ५००/- इतका दंड ...

Maharashtra Unlock: राज्यात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) वेगानं होत आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडाही आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई, 28 जुलै: महाराष्ट्र कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत चालला आहे. राज्यात कोरोना लसीकरण (Corona Vaccination) वेगानं होत आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडाही आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार (State Government) राज्यातील कोरोनाचे निर्बंध (restrictions) काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) सल्ला मागवला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात लवकरच अनलॉकची (unlock) पुन्हा प्रक्रिया सुरु होणार आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. दुकानांची वेळ वाढवली जाऊ शकते. तसंच काही अटींसह मुंबई लोकलमध्येही सामान्य नागरिकांना सूट देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.

सध्या राज्यभरात सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सर्व दुकानं सुरु ठेवण्यास मुभा आहे. त्यामुळे या वेळांमध्ये बदल केला जाऊ शकतो. तसंच सामान्य रेल्वे प्रवाशांना लोकलनं प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सामान्य प्रवाशांकडून वारंवार लोकल सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या निर्बंधामध्येही सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

मनसे जोशात!  पिता-पुत्राची वेगवेगळी जिल्हावारी

आरोग्य मंत्री राजेश टोपे मुख्यमंत्र्यांना आज यासंदर्भातला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. या अहवालानंतर राज्य सरकार राज्यातील निर्बंधासंदर्भात निर्णय घेतील.

सध्या राज्यात पाच टप्प्यात निर्बंध

रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे राज्यात जून महिन्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक (Maharashtra unlock in 5 levels) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या टप्पेवारीनुसार कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता या आधारावरच हे निर्बंध शिथील करण्यात येतात. दर आठवड्याला यात जिल्ह्यानुसार बदल होत असतात.

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असतो. पहिल्या टप्प्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर असलेले रुग्ण तर दुसऱ्या टप्प्यात 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण असलेल्या जिल्हे येतात.

शिल्पा शेट्टीच्या अडचणीत भरच भरच, क्लीन चीट नाहीच

तिसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्के किंवा 40 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांहून जास्त भरलेले जिल्हे येतात. पाचव्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त किंवा ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Coronavirus cases, Lockdown, Maharashtra News, Uddhav thackeray