Home /News /entertainment /

शिल्पा शेट्टीला क्लिन चीट नाही, मुंबई पोलिसांकडून स्पष्ट; बँक अकाऊंटची होणार तपासणी

शिल्पा शेट्टीला क्लिन चीट नाही, मुंबई पोलिसांकडून स्पष्ट; बँक अकाऊंटची होणार तपासणी

Shilpa Shetty:अश्लील फिल्म प्रकरणी अटकेत असलेला बिझनेसमन राज कुंद्राला (Raj Kundra Pornography Case)14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यातच शिल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

    मुंबई, 28 जुलै: अश्लील फिल्म प्रकरणी अटकेत असलेला बिझनेसमन राज कुंद्राला (Raj Kundra Pornography Case) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. क्राईम ब्रांन्चच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणात कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांना अद्याप क्लीन चिट (Clean Chit) दिली नाही. शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चीट देण्यात आलेली नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या अधिकाऱ्यानं सांगितलं की, हा तपासाचा भाग असल्याने आणि अकाऊंटची तपासणी केली जात आहे. शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. आमचा कोणाच्याही वैयक्तिक बँक अकाऊंटशी काही संबंध नाही. कुंद्राचे बँक अकाऊंट आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) क्राईम ब्रांन्चनं (Crime Branch) फॉरेन्सिक ऑडिटर (Forensic auditor) नियुक्त केलेत. क्राईम ब्रांन्चनं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीशी संबंधित राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि इतरांच्या बँक अकाऊंटची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्सना बोलविण्यात आलं आहे. सावध व्हा! ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट निश्चित, हे आकडे देताहेत संकेत कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल राजच्या कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. राजच्या कंपनीवर, हॉटशॉटवर (Hotshot) तसेच गहना वशिष्ठ (Gehana Vashisht) आणि आणखी 4 निर्मात्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मॉडेल आणि अभिनेत्रीने हा गुन्हा दाखल केला आहे. या मॉडेलने क्राइम ब्रँचला दिलेल्या माहितीनुसार तिला मोठ्या सिनेमाचं लालच दाखवून एका अडल्ट (Adult movie) सिनेमात काम करवून घेतलं होतं. यानंतर पोलिसांनी तिला एफआयआर दाखल करण्यास सांगितलं कारण ही घटना मालवणी परिसरात घडली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai crime branch, Mumbai police, Raj kundra, Shilpa shetty

    पुढील बातम्या