मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Omicron चा धोका वाढल्याने निर्बंध लागू, शाळा सुरू राहणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं...

Omicron चा धोका वाढल्याने निर्बंध लागू, शाळा सुरू राहणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं...

Omicron cases in Maharashtra: महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांच्या संखघ्येत वाढ होत असताना आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक चिंता व्यक्त केली आहे.

Omicron cases in Maharashtra: महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांच्या संखघ्येत वाढ होत असताना आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक चिंता व्यक्त केली आहे.

Omicron cases in Maharashtra: महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांच्या संखघ्येत वाढ होत असताना आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक चिंता व्यक्त केली आहे.

जालना, 25 डिसेंबर : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant of Coronavirus) चिंता वाढली आहे. त्यातच महाराष्ट्रत ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आता शाळा (School) पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच दरम्यान आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी एक भीती व्यक्त केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शाळा नियमित सुरू राहतील मात्र निर्बंध कटाक्षाने पाळावे. आज ओमयक्रोन आकडा शंभरीत असताना डबल ने वाढतोय, जर हजारावर आकडा जाऊन दुपटीने अशीच वाढ झाल्यास परिस्थिती चिंताजनक होईल. ओमायक्रोनचा वाढता प्रभाव आणि शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाची गरज असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.

लस न घेतलेल्या नागरिकांचा शोध घेऊन समुपदेशनाने मन परिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीसाठी केंद्राकडे मागणी केलेली आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

वाचा : दादरमधल्या प्रयोगशाळेतच Corona चा शिरकाव, BMC नं उचललं मोठं पाऊल

महाराष्ट्रात निर्बंध लागू

राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत. 24 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.

इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.

वाचा : राज्यात Omaicron चा धोका वाढला, रुग्णांची संख्या 100 पार, मुंबई होतेय हॉटस्पॉट!

उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

वाचा : Delta, Omicron नंतर Delmicron; किती धोकादायक आहे कोरोनाचा Double Variant?

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Rajesh tope, महाराष्ट्र