मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढला, रुग्णांची संख्या 100 पार, मुंबई होतेय हॉटस्पॉट!

BREAKING : राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढला, रुग्णांची संख्या 100 पार, मुंबई होतेय हॉटस्पॉट!

 मुंबईमध्ये (mumbai) सर्वाधिक 11 तर पुण्यात 6 रुग्ण आढळले आहे.

मुंबईमध्ये (mumbai) सर्वाधिक 11 तर पुण्यात 6 रुग्ण आढळले आहे.

मुंबईमध्ये (mumbai) सर्वाधिक 11 तर पुण्यात 6 रुग्ण आढळले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 24 डिसेंबर :  राज्यात कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे (Omaicron ) रुग्ण वाढत चालले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची शक्यता आहे. आज राज्यभरात 20 रुग्ण (Omaicron patients) आढळले आहे.  मुंबईमध्ये (mumbai) सर्वाधिक 11 तर पुण्यात 6 रुग्ण आढळले आहे. राज्यात आता 108 रुग्णांनी टप्पा गाठला आहे.

राज्य आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज राज्यात  ओमायक्रॉन संसर्गाचे  २० रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यातील 14 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर 6 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत. पुण्यात आज ६ रुग्ण आढळले आहे. यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत १ रुग्ण तर पुणे छावणी बोर्डाच्या हद्दीत ५ रुग्ण आढळून आले आहे

तर मुंबईमध्ये एकूण ११ रुग्ण आढळले आहे.  तर सातारा  २, अहमदनगर  १ यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. या २० रुग्णांपैकी १५ जण हे आंतरराष्ट्रीय प्रवासी, तर २ आंतरदेशीय प्रवासी आणि ४ जणांना ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संपर्कातून लागण झाली आहे. यात १२ रुग्णांचे लसीकरण हे पूर्ण झाले होते. तर ७ रुग्णांचे लसीकरण झाले नाही आणि १ रुग्णाचे वय हे १८ वर्षांखालील आहे. दरम्यान, आज राज्यात १४१० रुग्णांचे निदान झाले आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६८ रुग्ण बरे झाले आहे.

रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी

दरम्यान, राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसंच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

असे असतील निर्बंध

- संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

- लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

- इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

- उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे. अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

- क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

- वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

-उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

First published: