Home /News /explainer /

Delta, Omicron नंतर Delmicron; किती धोकादायक आहे कोरोनाचा Double Variant?

Delta, Omicron नंतर Delmicron; किती धोकादायक आहे कोरोनाचा Double Variant?

डेल्टा (Delta), ओमिक्रॉननंतर (Omicron) आता चर्चेत आला आहे तो डेल्मिक्रॉन (Delmicron)

मुंबई, 23 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरातले बहुतांश देश कोरोनाचा (Corona) सामना करत आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा प्लस असे वेगवेगळे व्हॅरिएंट्स आढळून आले आहेत. कोरोना विषाणू (Coronavirus) दोन वर्षांच्या कालावधीत अनेक वेळा म्युटेट (Mutate) झाल्यामुळे नवे व्हॅरिएंट्स तयार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) हा नवा व्हॅरिएंट (Corona Variant) आढळून आला. त्यानंतर अल्पावधीतच अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले. भारतातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच आता पुन्हा अजून एका नव्या व्हॅरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. डेल्मिक्रॉन (Delmicron) असं या नव्या व्हॅरिएंटचं नाव आहे. डेल्मिक्रॉन हा कोरोनाचा डबल व्हॅरिएंट (Double Variant) असून, त्याचा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये प्रसार वाढत आहे. सध्या डेल्मिक्रॉनचा संसर्ग अमेरिका आणि युरोपात वाढताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, वास्तविक डेल्मिक्रॉन हा डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हॅरिएंटचं मिश्रण (Mixture) आहे. डेल्मिक्रॉन हे नाव डेल्टा आणि ओमिक्रॉन या नावांवरून दिलं गेलं आहे. हे दोन्ही व्हॅरिएंट भारतात सध्या अस्तित्वात आहेत. डेल्मिक्रॉनची लाट धोकादायक ठरू शकते, असं तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत अनेक देश डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हॅरिएंटचा सामना करत आहेत. या व्हॅरिएंटचा संसर्ग झालेली रुग्णसंख्या वाढल्यानं डेल्मिक्रॉनचा संसर्ग निर्माण झाला आहे. हे वाचा - मोठी बातमी: Omicron व्हेरिएंटवर दक्षिण आफ्रिकेत अभ्यास, झाले धक्कादायक खुलासे कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटला रोमनऐवजी ग्रीक वर्णमालेनुसार (Greek Alphabet) नाव देण्याचा निर्णय यापूर्वीच डब्ल्यूएचओने (WHO) घेतला आहे. ग्रीक वर्णमालेतलं हे 15वं अक्षर आहे. याचा अर्थ क्रिटिकल किंवा गंभीर असा होतो. 9 नोव्हेंबरला ओमिक्रॉन या व्हॅरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. हा व्हॅरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याने ही बाब डब्ल्यूएचओनं अधिक गंभीरपणे घेतली आणि 26 नोव्हेंबर रोजी या व्हॅरिएंटचं नामकरण ओमिक्रॉन असं करण्यात आलं. हे वाचा - गोळी खाऊन घरबसल्या करा कोरोना उपचार; मृत्यूचा धोका कमी, इथे Paxlovid ला मंजुरी डेल्टा आणि ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, आर-नॉट व्हॅल्यू ( R Naught Value) म्हणजेच रुग्ण बाधित होण्याचा दरही वाढताना दिसत आहे. भारतातल्या काही राज्यांमध्ये हा दर 0.89 पेक्षा अधिक झाला आहे. विषाणूचा संसर्ग झालेली एक व्यक्ती सरासरी किती निरोगी लोकांना आजारी पाडू शकते, हे आर-नॉट व्हॅल्यूवरून समजतं. ही व्हॅल्यू अशीच वाढत राहिली, तर कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढू शकते. या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Explainer

पुढील बातम्या