मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /दादरमधल्या प्रयोगशाळेतच Corona चा शिरकाव, डझनभर लोकं पॉझिटिव्ह; BMC नं उचललं मोठं पाऊल

दादरमधल्या प्रयोगशाळेतच Corona चा शिरकाव, डझनभर लोकं पॉझिटिव्ह; BMC नं उचललं मोठं पाऊल

राजधानी मुंबई (Mumbai)मध्ये, मुंबई पालिकेनं (BMC ) नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोणत्याही बंद किंवा खुल्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घातली आहे.

राजधानी मुंबई (Mumbai)मध्ये, मुंबई पालिकेनं (BMC ) नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोणत्याही बंद किंवा खुल्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घातली आहे.

राजधानी मुंबई (Mumbai)मध्ये, मुंबई पालिकेनं (BMC ) नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोणत्याही बंद किंवा खुल्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घातली आहे.

मुंबई, 25 डिसेंबर: महाराष्ट्रात (Maharashtra)कोरोनाचा (Corona Virus) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) धोका पाहता नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनावर निर्बंध आले आहेत. राजधानी मुंबई (Mumbai)मध्ये, मुंबई पालिकेनं (BMC ) नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कोणत्याही बंद किंवा खुल्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घातली आहे. याशिवाय दादर (पश्चिम) येथील एक लॅबही बीएमसीने सील केली आहे. लॅबमध्ये काम करणारे 12 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive)आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

शुक्रवारी, महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईच्या दादर (पश्चिम) येथील एक प्रयोगशाळा मुंबई महानगरपालिका (BMC) ने सील केली आहे. ज्या लॅबमध्ये काम करणारे 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मुंबई ठरतेय हॉटस्पॉट

काल राज्यभरात ओमायक्रॉनचे 20 रुग्ण (Omicron patients) आढळले आहे. मुंबईमध्ये (mumbai) सर्वाधिक 11 तर पुण्यात 6 रुग्ण आढळले आहे. राज्यात आता 108 रुग्णांनी टप्पा गाठला आहे. राज्य आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईमध्ये एकूण 11 रुग्ण आढळले आहे.

BMC आयुक्तांनी जारी केले आदेश

नाताळ सण (Christmas) आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. त्यानंतर मुंबईतही मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- Pro Kabaddi League: दिल्ली ठरली मुंबईवर 'दबंग', पिछाडीनंतरही दिला धक्का

कोविड-19 ची वाढती प्रकरणे लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका आयुक्त (BMC commissioner) यांनी नवीन वर्षाच्या पार्टीवर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. यामध्ये खुल्या किंवा बंद ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. हा आदेश 25 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पासून लागू करण्यात आला आहे. बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या आदेशानुसार, कोरोनाबाबतच्या या आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आयपीसी कलम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. हा नवा आदेश राज्य सरकारच्या आदेशाव्यतिरिक्त आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Mumbai